Wed, Nov 14, 2018 12:10होमपेज › Soneri › रणवीर सिंह ‘संग्राम भालेराव’ आणि सिम्बा

रणवीर पुन्हा एकदा मराठी भूमिकेत

Published On: Dec 07 2017 2:42PM | Last Updated: Dec 07 2017 2:42PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता रणवीर सिंह पुन्हा एकदा मराठी माणसाची भूमिका साकारण्यासाठी तयार झाला आहे. ‘बाजीराव मस्तानी’मधील रणवीरने साकारलेली बाजीराव ही मराठी भूमिका चाहत्यांना आवडली होती. आता रणवीर ‘सिम्बा’ या चित्रपटात ‘संग्राम भालेराव’ ची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. 

खास गोष्ट म्हणजे बाजीराव आणि अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका साकारणारा रणवीर आता पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिम्बामध्ये रणवीर एका मराठी पोलिसाची भूमिका साकारणार आहे. 


बॉलिवूडच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन महान दिग्दर्शकांची जोडी या प्रोजेक्टसाठी एकत्र आली आहे. ‘सिम्बा’ या प्रोजेक्टसाठी करण जोहर आणि रोहित शेट्टी एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री म्हणून कोण दिसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.