Thu, Mar 21, 2019 00:54होमपेज › Soneri › रणवीर सिंह होणार घरजावई?

रणवीर सिंह होणार घरजावई?

Published On: Nov 09 2018 6:21PM | Last Updated: Nov 09 2018 6:20PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडची हिट जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्‍या लग्‍नाला केवळ ५ दिवस राहिले आहेत. दोघांचे लग्‍न १४ आणि १५ नोव्‍हेंबरला इटलीमध्‍ये होणार आहे. विशेष म्‍हणजे विराट कोहली आणि अनुष्‍का शर्माचं देखील लग्‍न इटलीमध्‍ये झालं होतं. आता लग्‍नानंतर दीपिका-रणवीर हे कपल हनीमूनसाठी कोठे जाणार? याची उत्‍सुकता त्‍यांच्‍या फॅन्‍सना लागून राहिली आहे. 

रणवीर-दीपिका इटलीत लग्‍न केल्‍यानंतर पहिला रिसेप्शन दीपिकाच्‍या घरी अर्थातच बंगळुरूमध्‍ये आयोजित केलं जाणार आहे. रिसेप्शननंतर दोघे मुंबईला परतणार आहेत. 

रणवीर आपल्‍या नव्‍या घराच्‍या शोधात आहे. नवे घर मिळूपर्यंत रणवीर आणि दीपिका हे दोघे दीपिकाच्‍या घरी राहणार आहे. दीपिकाचं एक घर मुंबईमध्‍ये आहे, जेथे ते दोघे आपला संसार मांडणार आहेत. दीपिकाचं घर मुंबईतील प्रभादेवी अपार्टमेंटमध्‍ये आहे. दोघे टाईम स्‍पेन्‍ड करत आहेत. 

दरम्‍यान, रणवीरने संजय लीला भन्‍साळी यांना लग्‍नाची पत्रिका दिल्‍याचे वृत्त आहे. 

लग्‍नानंतर रणवीर आपला आगामी चित्रपट 'सिम्बा'च्‍या शूटिंगसाठी जाणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टी आणत आहे. दीपिका देखील आपल्‍या आगामी प्रोजेक्ट्समध्‍ये बिझी असणार असल्‍याचे वृत्त आहे.