Tue, Oct 24, 2017 16:52होमपेज › Soneri › पद्मावतीच्या दागिन्यांचे वजन ऐकून थक्क व्हाल

पद्मावतीच्या दागिन्यांचे वजन ऐकून थक्क व्हाल

Published On: Oct 13 2017 5:45PM | Last Updated: Oct 13 2017 5:50PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

राणी पद्मावती हे नाव जर कोणी सध्या उच्चारल तर प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर दीपिका पदूकोन येते. भरजरी वस्त्र, भरगच्च दागिने, कानातले झुमके आणि डोक्यावर घेतलेला घुंगट हे चित्र डोळ्यासमोर आले की, राणी पद्मावती साकारताना दीपिकाला किती मेहनत घ्यावी लागली असेल याची जाणीव होते. हे दागिने किती वजनाचे असतील याचा अंदाज बांधणे अवघड आहे. पण आज जाणून घ्या दीपिकाच्या दागिन्यांचे खरे वजन काय आहे. 

35 KG वजन के साथ शूट करती थीं दीपिका, 4 किलो का सिर्फ दुपट्टा ही

राणी पद्मावतीला पडद्यावर हुबेहुब साकारण्यासाठी दीपिकाने प्रचंड मेहनत घेतली आहे. पण ही अवघड भूमिका दीपिकाने अगदी लिलया पेलली आहे, असे चित्रपटाचा ट्रेलर पाहून लक्षात येते. 

35 KG वजन के साथ शूट करती थीं दीपिका, 4 किलो का सिर्फ दुपट्टा ही

पद्मावती ही एक राजपूत राणी होती. तिच्या परफेक्ट लूकसाठी दीपिकाने आयब्रोजचा आकार बदलून युनिब्रो लूक केला आहे. दीपिकाने घातलेले दागिने २० किलोचे असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तिने डोक्यावर घेतलेला खड्यांची सजावट असलेला दुपट्टा म्हणजेच ओढणी किलोची आहे. जरीचे काठ, सोनेरी खडे, आणि मोत्यांची डिझाईन असलेले तब्बल ३५ किलोची वस्त्रे परिधान करून चित्रपट दीपिकाने अनेक तास चित्रीकरण केले आहे. 

35 KG वजन के साथ शूट करती थीं दीपिका, 4 किलो का सिर्फ दुपट्टा ही

35 KG वजन के साथ शूट करती थीं दीपिका, 4 किलो का सिर्फ दुपट्टा ही

कोण होती  राणी पद्मावती

राणी पद्मावतीबद्दल मलिक मोहम्मद जायसीने सन १५९७ मध्ये ‘पद्मावत’ हे सूफी महाकाव्य लिहिले आहे. १३१५ मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीच्या मृत्यूनंतर राणी पद्मावतीच्या अस्तित्वाबद्दल सांगणारा हा पहिलाच पुरावा मानला जातो. पण असेही म्हटले जाते की पद्मावतीही हे काल्पनिक पात्र होते. 

आता राणी पद्मावतीच्या जीवनावर आधारित चित्रपटात अनेक रहस्यांचा उलगडा होईल, असे सांगण्यात येत आहे. जायसीच्या महाकाव्यात असलेली राणी राजस्थानची नसून तिचा संबंध श्रीलंकेशी जोडण्यात आला होता.  

Related image