Tue, Apr 23, 2019 01:34होमपेज › Soneri › रजनीकांतची मुलगी दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात

रजनीकांतची मुलगी दुसऱ्यांदा विवाहबंधनात

Published On: Feb 11 2019 5:53PM | Last Updated: Feb 11 2019 5:53PM
चेन्नई : पुढारी ऑनलाईन

दाक्षिणात्‍य सुपरस्‍टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या ही उद्योजक विशगन वंगामुडी यांच्यासोबत सोमवारी  (दि. ११ फेब्रुवारी) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.    

हा विवाह चेन्नईच्या 'लीला पॅलेस' मध्ये रितीरिवाजसह संपन्न झाला. लग्नसोहळा सकाळी आकरा वाजता सुरू झाला. विवाह सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

याच्याआधी ८ फेब्रुवारीला या विवाहनिमित्त रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सर्व जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. सौंदर्याचे हे दुसरे लग्न आहे. पहिले लग्न उद्योगपती अश्विन रामकुमार याच्यांशी झाले होते. त्यांच्यात ७ वर्षांनी २०१७ मध्ये घटस्फोट झाला होता. सौंदर्याला एक मुलगा असून त्याचे नाव वेद कृष्ण आहे.  

विशगन वंगामुडी हे फार्मास्युटिकल कंपनाचे मालक आहेत. याशिवाय त्यांनी चित्रपटातही काम केले आहे. विशगन याचेही हे दुसरे लग्न आहे. विशगन यांचे पहिले लग्न कनिका कुमार यांच्याशी  झाले होते. 

वेद कृष्णा आपल्या आई सौंदर्याच्या हातावरील मेहंदी पाहत असल्याचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.  

 मेहंदी की रस्म में अपनी मां सौंदर्या के हाथों की मेहंदी देखते वेद कृष्ण. वेद और सौंदर्या की ये तस्वीर सोशल मीडिया पर काफी पसंद की जा रही है.