Fri, Dec 13, 2019 18:26होमपेज › Soneri › राधिका म्हणते, वाढलेल्या वजनामुळे चित्रपटात घेतले नाही

राधिका म्हणते, वाढलेल्या वजनामुळे चित्रपटात घेतले नाही

Published On: Jun 27 2019 4:56PM | Last Updated: Jun 27 2019 4:23PM
'विकी डोनर'ची ऑफर मिळाली होती राधिकाला 

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने 'अंधाधुन' या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच सुपरहिट ठरला आहे. 'अंधाधुन' या चित्रपटात राधिकासोबत आयुष्यमान खुराना होता. 

त्याआधी राधिकाला आयुष्यमानसोबत एका चित्रपटाची ऑफर आली होती. त्या चित्रपटाचे नाव होते 'विक्की डोनर'. परंतु राधिकाची जागा यामी गौतमने घेतली याचा खुलासा स्वत: राधिकाने एका चॅट शोमध्ये केला आहे.  

dinsta    

एका मुलाखतीत राधिकाने सांगितले आहे की, 'यामी गौतमच्या याधी या चित्रपटाची ऑफर मला मिळाली होती.

राधिकाचे वजन जास्त असल्याने निर्मात्यांनी तिला या चित्रपटात घेतले नाही. 

Related image

पुढे राधिकाने सांगितले की, 'मी सुट्टीवर गेले होते आणि तेथे खूपच बिअर आणि जेवण केल्याने माझे वजन वाढले. राधिकाने चित्रपट निर्मात्यांना सांगितले की, मी परत आल्यानंतर वजन कमी करते. परंतु निर्माते कोणताही धोका पत्करू शकत नव्हते. या घटनेचा माझ्यावर अधिक प्रभाव पडला. यानंतर मी व्यायामाला घेवून जास्तच सीरियस झाले आणि माझ्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देवू लागले. त्यावेळी आयुष्यमान खुराना खूपच सडपातळ होता. त्यामुळे दोघांची जोडी चांगली दिसली असती.'  

dinsta

आयुष्यमान खुराना सध्या आगामी 'आर्टिकल १५'या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट २८ जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटात आयुष्यमानने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

dinsta  

तर राधिका आपटे सध्या 'रात अकेली'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात राधिकासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी झळकणार आहे. याशिवाय राधिका दुसरे महायुद्धावर आधारित आंतरराष्ट्रीय  'लिबरेट: ए कॉल टू स्पाई' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात राधिका प्रसिद्ध गुप्तहेर 'नोरा बेकर' च्या भूमिकेत दिसणार आहे. 

Related image

dinsta