Thu, Sep 21, 2017 23:14
30°C
  Breaking News  

होमपेज › Soneri › सागर किनारे राधिकाचा बोल्ड अंदाज

सागर किनारे राधिकाचा बोल्ड अंदाज

Published On: Jul 17 2017 3:14PM | Last Updated: Jul 17 2017 3:08PM

बुकमार्क करा


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाइन वृत्त अभिनेत्री राधिका आपटे सध्या बॉलिवूडमधील ग्लॅमर जगापासून दूर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.राधिकाने तिच्या व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. राधिकाने इन्स्टाग्रावर एका बीचवरील बिकनीतील फोटो शेअर केला आहे.या फोटोला २० हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
अन्य एका फोटोमध्ये राधिका लाल आणि काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसते. या फोटोत राधिका टोमॅटो खात आहे.

Tomatoes for lunch #beachpicnic #juicytomatoes #Tuscany #deliciousness #superhealthy #holiday

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

राधिकाने इन्स्टाग्रामवर समुद्र किनाऱ्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने एका प्राण्याला पकडल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ शूट केल्यानंतर त्या प्राण्याला पाण्यास सोडल्याचे राधिकाने म्हटले आहे.
राधिकाने कॉलेजमध्ये असल्यापासून चित्रपटात लहान भूमिका केल्या आहेत. २००५मध्ये आलेल्या 'वाह! लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटातून राधिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तीने बंगाली आणि मराठी चित्रपटात देखील काम केले.
सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोबत 'कबाली' चित्रपटात राधिकाची मुख्य भूमिका होती. 'शोर इन द सिटी', 'लय भारी', 'बदलापूर', 'मांझी- द माउंटन मॅन', 'फोबिया' या चित्रपटातील राधिकाच्या अभिनयाची चर्चा झाली होती. हर्षवर्धन कपूरच्या 'भावेश जोशी' या चित्रपटातून राधिकाला लवकरच पाहता येणार आहे.