Thu, Mar 21, 2019 23:23
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › 'दबंग' खानला खुश करण्यासाठी 'प्रियांका'ची अनोखी शक्कल !

'दबंग' खानला खुश करण्यासाठी 'प्रियांका'ची अनोखी शक्कल !

Published On: Aug 10 2018 4:26PM | Last Updated: Aug 10 2018 4:19PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवुड अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवुडसह हॉलिवुडमध्‍ये आपल्‍या अभिनयाच्‍या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बर्‍याद दिवसानंतर ती सलमान खानच्‍या भारत चित्रपटातून बॉलिवुडमध्‍ये कमबॅक करणार होती. त्‍यामुळे प्रियांकाचे चाहत्‍यांच्‍यासाठी ही खूशखबर होती. पण  वैयक्‍तीक कारणासाठी प्रियांकाने  सलमानचा 'भारत' चित्रपट सोडला. आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राबद्दल सोशल मीडियावर  चर्चा रंगू लागल्‍या. 

Image result for PRIYANKA CHOPRA

'भारत' सोडून गेल्याने सलमान नाराज असल्याची जाणीव प्रियांकाला कदाचित झाली असेल त्यामुळे तिने अनोखी शक्कल लढवत एक ट्विट केले आहे.

Image result for PRIYANKA CHOPRA

सलमानला खुश करण्यासाठी प्रियांकाने ट्विटवर त्याचा मेहुणा आयुष शर्माच्या 'लवरात्री' चित्रपटाबद्दल एक खास ट्विट केले आहे. 'माझा मित्र आयुष शर्मा तुझे बॉलिवूडमध्ये स्वागत आहे. चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिला आणि मला विश्वास आहे तू नक्कीच एक चांगला अभिनेता होशील' असे ट्विट तिने केले आहे.

काहीदिवसांपूर्वी सलमानला प्रियांकाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, प्रियांकाने भलतेच कारण सांगून चित्रपट सोडला आहे. आता  सलमान खानची नाराजी दूर करण्‍यात प्रियांका चोप्रा  यशस्‍वी होते  का याची उत्‍सुकता लागली आहे.