Tue, Oct 24, 2017 16:59
29°C
  Breaking News  

होमपेज › Soneri › प्रियांकाचे नवे गाणे पाहिले का?

प्रियांकाचे नवे गाणे पाहिले का?

Published On: Aug 12 2017 2:54PM | Last Updated: Aug 12 2017 2:53PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाइन 

हॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री तर मिळते पण ती टिकवणे तितकेच आव्हानात्मक आहे. हेच आव्हान बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अगदी लिलया पेलले आहे. तिने नुकतेच एक गाणे रिलीज केले आहे. विषेश म्हणजे हे गाणे तिने स्वत: लिहिले आहे. गाण्याचा व्हिडिओ प्रियांकाने ट्विटर व इंस्टग्रामवर शेअर केला आहे.

प्रियांकाच्या नव्या गाण्याचे नाव ‘Young and Free’ असे आहे. प्रियांकासोबत या गाण्यात ऑस्ट्रोलियन निर्माता आणि डिजे विल स्पार्कही दिसत आहे. एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये,‘जेव्हा माझे आयुष्य खूप अस्थिर होते. त्यावेळी मी हे गाणे लिहिले आहे. ’ तसेच ‘हे गाणे बनवण्यासाठी विल स्पार्कचा खूप मोठा सहभाग आहे’ असेही प्रियांका चोप्राने म्हटले आहे. 

प्रियांकाने ‘Thank you @willsparks, @tobygad, #RachelRabin & @tydollasign. It's our time to be #YoungAndFree @billboarddance’ असे ट्विटही केले आहे. ‘Young and Free’ गाण्याच्या बोलावरून असे लक्षात येते की, त्यावेळी प्रियांकाला फ्रिडमची खूप गरज होती.