होमपेज › Soneri › प्रियांका-निक 'या' दिवशी बॉलिवूडकरांना देणार पार्टी!

प्रियांका-निक 'या' दिवशी बॉलिवूडकरांना देणार पार्टी!

Published On: Dec 07 2018 2:47PM | Last Updated: Dec 07 2018 1:50PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

प्रियांका आणि निक जोनस यांच्‍या लग्‍नाचे रिसेप्‍शन दिल्‍लीत थाटात पार पडले. यानंतर बॉलिवूड सेलेब्‍ससाठी रिसेप्‍शन पार्टी कधी असणार याची उत्‍सुकता लागली आहे. मात्र प्रियांका एवढ्‍यात बॉलिवूड सेलेब्‍सना रिसेप्‍शन पार्टी देणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. 

प्रियांका आणि निक नुकतेच लग्‍नाच्‍या बंधनात अडकले आहेत. १ आणि २ डिसेंबरला प्रियांका  आणि निक यांनी जोधपूरमधील उमेद भवनमध्‍ये  ख्रिश्‍चन व  हिंदू पद्धतीने लग्‍न केले. प्रियांका आणि निकच्‍या लग्‍नाच्‍या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. लग्‍नानंतर या जोडीने ४ डिसेंबरला दिल्‍लीत रिसेप्‍शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत प्रियांक व निकच्‍या कुटुंबातील सदस्‍य व काही मोजकेच पाहूणे सहभागी झाले होते. या ग्रॅण्‍ड पार्टीत सर्वात खास पाहूणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. आता प्रियांका दुसर्‍या रिशेप्‍शन पार्टीची तयारी करत असल्‍याची माहिती मिळाली आहे. ही पार्टी खास बॉलिवूड सेलेब्‍ससाठी असणार आहे. 

२० डिसेंबरला प्रियांका बॉलिवूड सेलेब्‍सना रिशेप्‍शन पार्टी देणार असल्‍याची माहिती मिळाली आहे. प्रियांका आणि निकचे मित्र व बॉलिवूड सेलेब्‍स यांच्‍यासाठी या पार्टीचे आयोजन करण्‍यात आली आहे. या पार्टीत बॉलिवूड सेलेब्‍सचा लूक कसा असणार व प्रियांका बॉलिवूडमधील कोणाला अमंत्रण देणार याबद्दल चाहत्‍यांना उत्‍सुकता लागली आहे. 

सोनाली बोसच्‍या 'द स्काई इज़ पिंक' हा प्रियांकाचा आगामी चित्रपट आहे. यामध्‍ये तिच्‍यासोबत बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि जायरा वसीम दिसणार आहे.