Thu, Jan 24, 2019 07:40होमपेज › Soneri › 'पॅडमॅन'ची कथा चोरीची म्‍हणणे मुर्खपणा'

'पॅडमॅन'ची कथा चोरीची म्‍हणणे मुर्खपणा'

Published On: Feb 13 2018 4:48PM | Last Updated: Feb 13 2018 4:49PMनवी दिल्‍ली : वृत्तसंस्‍था 

अभिनेता अक्षय कुमारच्‍या पॅडमॅन या चित्रपटाची कथा चोरीची असल्‍याचा आरोप एका लेखकाने केल्‍यानंतर या चित्रपटाचे दिग्‍दर्शक आर बाल्‍की यांनी याबाबत खुलासा केला आहे. चित्रपटाची स्‍क्रिप्‍ट चोरीची आहे, असे म्‍हणणे मुर्खपणाचे आहे, असे बाल्‍की यांनी म्‍हटले आहे. प्रत्‍येक चित्रपटानंतर काही लोक असे मुर्खपणाचे दावे करतात. माझा चित्रपट हा मुरूगनाथमच्‍या औपचारिक बायोग्राफीचा भाग आहे. मुरूगनाथम त्‍यांचं आयुष्‍य आरोप करणार्‍याच्‍या स्‍क्रिप्‍टमुळेच जगत आहेत का? असा प्रश्‍नही बाल्‍की यांनी उपस्‍थित केला. 

Image result for padman film r balki after allegations

लेखक रिपू दमन जायसवालने पॅडमॅनची कथा आपण लिहिली असून 'पॅडमॅन'च्‍या निर्मात्‍यांनी ही कथा चोरल्‍याचा आरोप केला होता. रिपूने आपल्‍या फेसबुक अकाउंटवर २० डिसेंबर २०१७ ला एक मोठी पोस्ट लिहिली होती. यात त्‍याने म्‍हटले होते....

'मी दीड वर्षांपूर्वी मी अरुणाचलम मुरुगनाथम आणि साती बायॉडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्सवर कथा लिहिली होती. ती कथा मी ५ डिसेंबर २०१६ ला स्क्रीन रायटर असोसिएशनमध्‍ये रजिस्‍टर केली होती. आणि रेयान स्टीफन (करण जौहर प्रॉडक्शनचे क्रिएटिव्‍ह हेड) आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्‍याकडे पाठवली होती. १० दिवसांनंतर १६ डिसेंबर २०१६ ला मी ऐकलं की मिसेस ट्‍विंकल खन्‍ना यांनी घोषणा केली की त्‍यांचं प्रोडक्‍शन हाऊस अरुणाचलम मुरुगनाथमच्‍या आयुष्‍यावर अक्षय चित्रपट बनवणार आहेत. 

रिपूने पोस्टमध्‍ये पुढे म्‍हटले होते, 'नुकताच 'पॅडमॅ'नचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्‍यातील बहुतांश सीन्‍स माझ्‍या कथेतून चोरले गेले आहेत. ही कथा मी रेयान स्टीफनना पाठवली होती. इतकेच नव्‍हे, माझ्‍या कथेतील काल्पनिक सीन (रक्षाबंधन सीन) देखील चोरण्‍यात आला आहे. खरं म्‍हणजे अरुणाचलमची बहिणच नाहीये. मी निर्णय घेतला आहे की, मी हे प्रकरण कोर्टात नेईन आणि चित्रपट निर्मात्‍यांविरोधात लढेन.'
Image result for padman film r balki after allegations