Sun, Feb 23, 2020 15:40होमपेज › Soneri ›  'ये रे ये रे पैसा २' मध्ये दिसणार नेहा शितोळे 

 'ये रे ये रे पैसा २' मध्ये दिसणार नेहा शितोळे 

Published On: Aug 20 2019 3:51PM | Last Updated: Aug 20 2019 3:45PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन  

बिग बॉस मराठी सीझन-२ ची स्पर्धक नेहा शितोळेसाठी ऑगस्ट महिन्याची खूप छान सुरुवात झाली आहे. कारण, या महिन्यात एका मागोमाग अशा अनेक सुखावह गोष्टी नेहाच्या बाजूने घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातील एक मोठी गोष्ट म्हणजे, घरात पाहुणे म्हणून आलेल्या 'ये रे ये रे पैसा २' सिनेमाच्या टीमद्वारे नेहाला आगामी 'येरे येरे पैसा ३' मध्ये काम करण्याची नामी संधी चालून आली आहे! अभिनेता प्रसाद ओकने या सिनेमाच्या तिसऱ्या सिक्वेलमध्ये नेहाचा समावेश करण्यात आला असल्याची अधिकृत घोषणा केली. नेहासाठी ही सुखद गोष्ट असून, बिग बॉसच्या घरात असतानाच जर तिला अशी संधी चालून येत असेल, तर स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्याकडे असे किती कामे चालून येतील...! 

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या विकेंडच्या डावातील 'फ्रेंडशीप डे' स्पेशल भागात तिचा खास मित्र आणि 'सेक्रेड गेम'मधील सहकलाकार 'जितेंद्र जोशी'ने तिला मैत्रीच्या शुभेच्छा देत खुश केले होते. त्यानंतर झालेल्या कॅप्टनशिपच्या टास्कमध्ये दर्जेदार कामगिरी करत नेहाने एक आठवड्याची इम्युनिटीदेखील आपल्या खिशात घातली होती. इतकेच नव्हे तर, इतर टास्कमध्येदेखील नेहाने चांगली कामगिरी केली होती. 'सेक्रेड गेम'च्या दुसऱ्या सीझनमधून ती लोकांच्या भेटीस आली आहे.