Fri, Jun 05, 2020 01:09होमपेज › Soneri › सलमानच्या 'लव्‍हरात्री'ला धक्‍का, रिलीज होण्‍यापूर्वीच वादात 

सलमानच्या 'लव्‍हरात्री'ला धक्‍का, रिलीज होण्‍यापूर्वीच वादात 

Published On: Sep 12 2018 6:22PM | Last Updated: Sep 12 2018 6:21PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

'लव्हरात्री' चित्रपटात हिंदूच्या भावना दुखावल्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर बिहारमधील मुझफ्फरपूरनगर येथील न्यायालयाने अभिनेता सलमान खान आणि इतर ७ जणाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

सलमान खानची बहिण अर्पिताचा पती आयुष शर्मा 'लव्‍हरात्री' चित्रपटातून बॉलिवूड डेब्‍यू करत आहे. या चित्रपटाच्‍या टायटललाच काही जणांची आपत्ती दर्शवली आहे. 'लव्‍हरात्री' विरोधात बिहारमधील मुझफ्फरपूरनगर येथील न्यायालयाने केस दाखल करण्‍याचे आदेश दिले आहेत. त्‍यानंतर मिठनापुर पोलिस ठाण्‍यात केस दाखल करण्‍यात येणार आहे. या केसमध्‍ये सलमान खान, आयुष शर्मा, वरीना हुसैन, अंशुमान झा, राम कपूरसह ७ लोकांविरोधात केस दाखल करण्‍यात आलीय. 

'लव्‍हरात्री' सलमान खान प्रोड्यूस करत आहे. तर अभिराज मीनावाला दिग्‍दर्शन करत आहेत. ही एक लव्‍ह स्टोरी असून आयुष शर्मा आणि वरीना हुसैन बॉलिवूड डेब्यू करत आहे.