Tue, Oct 24, 2017 16:50होमपेज › Soneri › मिलिंद सोमनची गर्लफ्रेंड १८ वर्षाची 

मिलिंद सोमनची गर्लफ्रेंड १८ वर्षाची 

Published On: Oct 12 2017 3:59PM | Last Updated: Oct 12 2017 3:59PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मिलिंद सोमन हे नाव अभिनयापेक्षा त्याच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. पण हाच मिलिंद आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचा आणि एका मॉडेलचा फोटो  सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो ५१ वर्षाच्या मिलिंद सोबत त्याची १८ वर्षाची गर्लफ्रेंड अंकिताचा आहे. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

मुंबईत अमेजन इंडिया फॅशन वीक (एआईएफडब्‍ल्‍यू)मध्ये सहभागी झालेल्या मिलिंदने अंकितासोबतचा सेल्फी इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला आहे. या कार्यक्रमात मिलिंदने रॅम्पवॉक देखील केले. 

मिलिंदच्या १८ वर्षांच्या गर्लफ्रेंडचे नाव अंकिता कोनवार असून ती एअरहोस्टेस आहे. मिलिंदने त्याची लव्हस्टोरी सोशल मीडियावर स्वत:च सांगितली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे बरेच फोटो मिलिंदने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मिलिंद सोमनचे सध्याचे वय ५१ असून त्याने वयाच्या ५० व्या वर्षी अल्ट्रामॅरेथॉनसाठी ‘आयर्नमॅन’चा किताब जिंकला आहे. 

मिलिंदने २००६मध्ये ‘वॅली ऑफ फ्लॉवर्स’ या चित्रपटातील को-स्टार मॅलेन जाम्पनोईशी विवाह केला होता. पण, २००९ मध्ये हे दोघे वेगळे झाले होते. आता मिलिंदचे नाव अंकितासोबत जोडले जात आहे.              

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta

dinsta