Thu, May 28, 2020 12:19होमपेज › Soneri › मुंबई पोलिस भ्रष्‍ट, भडकली तनुश्री दत्ता

नानांना क्‍लिन चीट, भडकली तनुश्री दत्ता; म्‍हणाली-मुंबई पोलिस भ्रष्‍ट

Published On: Jun 13 2019 6:02PM | Last Updated: Jun 13 2019 6:02PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

ज्‍येष्‍ठ अभिनेते विनयभंगाचा आरोप करणारी तनुश्री दत्ताने संताप व्‍यक्‍त केला आहे. मीटू प्रकरणात नानांना क्‍लिन चीट मिळाल्‍यानंतर तनुश्रीने नाना पाटेकर आणि मुंबई पोलिसांना भ्रष्ट असे म्‍हटले आहे. खरंतरं, गेल्‍यावर्षी तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्‍यावर चित्रपट 'हॉर्न ओके प्लीज'च्‍या शूटिंगवेळी छेडछाडीचा आरोप केला होता. त्‍यानंतर हे प्रकरण पोलिसात आणि नंतर कोर्टात गेले. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीन चिट दिली आहे. मुंबई पोलिसांनी एक रिपोर्ट कोर्टात सादर केला. तनुश्रीने केलेल्‍या आरोपांबद्‍दल कुठलाही पुरावा नानांविरोधात नसल्‍याने त्‍यामध्‍ये पोलिसांनी म्‍हटले आहे. 

यानंतर आता तनुश्रीने मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. एका वृत्तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनुसार, तिने म्‍हटले आहे, एक भ्रष्ट पोलिस फोर्स आणि लीगल सिस्टमने एका अशा व्‍यक्‍तीला नाना पाटेकरला क्लीन चिट दिली आहे, त्‍यांच्‍यावर अनेक महिलांनी शोषण आणि भीती-धमकावण्‍याचे आरोप केले आहेत. 

वाचा : नाना पाटेकरांना मोठा दिलासा, तनुश्रीने केलेल्‍या आरोपांचे पुरावे नाहीत 

तनुश्री दत्ताने गेल्‍यावर्षी २००८ मध्‍ये हॉर्न ओके प्लीजच्‍या सेटवर शूटिंगवेळी आपल्‍याशी असभ्‍य वर्तन केले होते, असा आरोप केला होता. परंतु, त्‍यावेळी तिच्‍या या म्‍हणण्‍याकडे कुणी लक्ष दिले नाही. गेल्‍यावर्षी तनुश्री दत्ताने पुन्‍हा एकदा या घटनेबाबत उघडपणे सांगितले. मीटू या मोहिमेंतर्गत तिने ही घटना सांगितली होती. 

यानंतर नानांना 'हाउसफुल ४'मधून बाहेरचा रस्‍ता दाखवण्‍यात आला होता. 

नानांचे वकील काय म्‍हणतात? 

नाना पाटेकर यांच्‍यावर तनुश्री दत्ताने छेडछाडीचा आरोप केला होता. परंतु, याप्रकरणी मुंबई पोलिसांना कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. असा रिपोर्ट पोलिसांनी कोर्टात सादर केला. त्‍यामुळे नानांना मोठा दिलासा मिळाला आहे. याविषयी नानांचे वकील अनिकेत निकम यांनी एका वृत्तसंस्‍थेशी बोलताना सांगितले की, माझे क्‍लाइंट नाना पाटेकरांवर केलेले आरोप खोटे आहेत. नाना निर्दोष आहेत. त्‍यांना नक्‍की न्‍याय मिळेल.