Tue, Aug 20, 2019 15:50होमपेज › Soneri › ‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’चा ट्रेलर पाहिला का?(Video)

‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’चा ट्रेलर पाहिला का?(Video)

Published On: Feb 11 2019 2:15PM | Last Updated: Feb 11 2019 2:15PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

काही दिवसापूर्वी 'द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हा चित्रपट आला होता. त्‍यानंतर आता राकेश ओमप्रकाश यांचा 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' हा चित्रपटत येत आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 

स्वच्छता आणि शौचालय या प्रश्नाशी निगडीत या चित्रपटाची कथा असल्‍याची माहिती मिळाली आहे. आठ वर्षांचा कन्हैय्या मुंबईतल्या एका झोपडपट्टीत राहतो. उघड्यावर शौचालयास गेलेल्या त्याच्या आईचे जेव्हा लैंगिक शोषण होते, त्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलते. आईसाठी शौचालय बांधता यावे यासाठी हा कन्हैय्या पंतप्रधानांकडे मदत मागण्यास जातो. तुमच्या आईसोबत असे काही घडले असते तर तुम्ही काय केले असते असा सवाल तो या पत्राद्वारे पंतप्रधानांना विचारतो. अत्यंत गंभीर मुद्द्याला या चित्रपटात प्रभावीपणे मांडल्याचे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 

चित्रपटाचे मुंबईतील घाटकोपरच्या झोपडपट्टीमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अंजली पाटील, मकरंद देशपांडे, रसिका आगाशे, सोनिया अल्बिझुरी, अतुल कुलकर्णी आणि नचिकेत पूर्णपत्रे यांच्या भूमिका आहेत. 

चित्रपट दिग्‍दर्शक राकेश मेहरा यांच्‍या 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' या चित्रपटांपासून चाहत्‍यांना खूप अपेक्षा आहेत. आतापर्यंत राकेश मेहरा यांनी अशाच पद्धतीचे सामाजिक संदेश देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. हा चित्रपट येत्या १५ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.