Wed, Jul 08, 2020 00:58होमपेज › Soneri › नाना पाटेकरांना मोठा दिलासा, तनुश्रीने केलेल्‍या आरोपांचे पुरावे नाहीत 

नाना पाटेकरांना मोठा दिलासा, तनुश्रीने केलेल्‍या आरोपांचे पुरावे नाहीत 

Published On: Jun 13 2019 2:10PM | Last Updated: Jun 13 2019 2:10PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कथित विनयभंगाच्‍या प्रकरणात ज्‍येष्‍ठ अभिनेते नाना पाटेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्‍या आरोपांचे पुरावे नाहीत, असे पोलिसांनी म्‍हटले आहे. ओशिवरा पोलिसांचा चौकशी रिपोर्ट कोर्टात दाखल करण्‍यात आला आहे. तनुश्रीच्‍या विनयभंगप्रकरणी पुरावे नसल्‍याचे पोलिसांनी म्‍हटले आहे. 

वाचा : नाना पाटेकर वादावर तनुश्रीची बहिण म्‍हणाली...

नाना पाटेकरांच्या समर्थनार्थ पुणेरी कलाकार एकत्र

गेल्‍यावर्षी अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्‍येष्‍ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्‍यावर मीटू मोहिमेंतर्गत गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. 

वाचा : तीन साक्षीदारांचा खुलासा, नानांनी तनुश्रीची काढलेली छेड  

नाना पाटेकर-तनुश्री वाद : डेझी शाहला समन्‍स 

तनुश्री दत्ताला २००८ मध्‍ये हॉर्न ओके प्लीजच्‍या सेटवर गैरवर्तणुकीला सामोरे जावे लागले होते. त्‍यावेळी नाना पाटेकरांनी असभ्‍य वर्तन केल्‍याचा आरोप तनुश्रीने केला होता. या प्रकरणामुळे वाद उफाळल्‍यानंतर तनुश्री  परदेशात निघून गेली होती. २०१८ साली तनुश्री दत्ता भारतात परतली. याच दरम्यान एका मुलाखतीत तनुश्रीने आपल्या शोषणाची घटना सांगितली. यानंतर #MeToo मोहिम भारतात तीव्र झाली होती. मीटूमुळे अनेकांनी आपल्‍या शोषणाचे किस्‍से उघडकीस आणले.

वाचा : तनुश्री दत्ताचा खुलासा, ही केवळ अफवाच; नाना पाटेकरांना क्लीन चिट नाहीच