Tue, Oct 24, 2017 17:00
29°C
  Breaking News  

होमपेज › Soneri › ‘बापजन्म’ चा टिझर लॉन्च

‘बापजन्म’ चा टिझर लॉन्च

Published On: Aug 12 2017 6:21PM | Last Updated: Aug 12 2017 6:21PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाइन 

मराठी अभिनेता सचिन खेडेकर यांचा आगामी चित्रपट ‘बापजन्म’चा टिझर लॉन्च नुकताच करण्यात आला. हा टिझर शेअर करताना ‘बाबांच्या डायरीचे एक पान जिवंत झाले आहे! तुम्हीपण ते जगून पहा’ असे म्हटले आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्कंठा वाढली आहे. 

हा चित्रपट एका बापाच्या आयुष्यावर आधारीत आहे. टिझरची सुरूवात रेडीओच्या गाण्याने होते. सकाळी उठल्यापासून तो दिवसभरात कोणाला भेटतो, काय खातो, कोणासोबत मॅच पाहतो या सर्व गोष्टींच्या नोंदी तो एका डायरीत लिहून ठेवतो. टिझरमध्ये सचिनसोबत पुष्कराज चिरपुटकर सुद्धा दिसत आहे. 

जय छाब्रिया आणि सुमतिलाल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निपुण धर्माधिकारी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट १५ सप्टेंबर २०१७ ला प्रदर्शित होत आहे.