Thu, Mar 21, 2019 01:10होमपेज › Soneri › 'वंटास'ची झक्‍कास लव्‍हस्‍टोरी! ...पाहा Video

'वंटास'ची झक्‍कास लव्‍हस्‍टोरी! ...पाहा Video

Published On: Apr 16 2018 3:30PM | Last Updated: Apr 16 2018 3:30PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

'वंटास' हे वाचल्‍यानंतर तुम्‍हाला प्रश्‍न पडला असेल की, वंटास म्‍हणजे काय? त्‍याचा अर्थ काय? तर वंटास हे एका चित्रपटाचे नाव आहे. वंटास ही एक प्रेमकथा आहे. आणि त्‍या प्रेमकथेचा म्‍हणजेच चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झालाय.  

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ग्रामीण प्रेमकथांचा ट्रेंड आला असला तरी तसाच वाटणारा पण वेगळया आशयाचा 'वंटास' तुम्‍हाला पाहायला नक्‍की आवडेल. या चित्रपटात नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. ज्ञानेश्वर यादवराव उमक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलयं. तर गुरूकृपा प्रॉडक्शन एंटरटेन्मेंटच्या अमोल बापूराव लवटे यांची निर्मिती आहे. 

Image may contain: one or more people and text

'वंटास' ही कथा आहे गौरी आणि आंब्या यांची...उनाडक्या करणारा आंब्या गौरीच्या प्रेमात पडतो आणि तिला मिळवण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं, ही 'वंटास'ची गोष्ट आहे. अजय वरपे, स्नेहल, अक्षय माहूलकर, रमेश वेदपाठक हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. 

Image may contain: 1 person, smiling, beard and text

ही प्रेमकथा पाहायला तुम्‍हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. ४ मे ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. वंटास म्‍हणजे काय? हे चित्रपट पाहिल्‍यानंतरच कळणार आहे.  

Tags : marathi film vantas, release 4 may 2018, Dnyaneshwar Yadavrao Umak, Amol Lawate, Umesh Vedpathak, Shailendra Pawar