आता वाजिद खानच्या आईलाही कोरोनाची लागण 

Last Updated: Jun 02 2020 2:08PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन

प्रसिध्द संगीतकार वाजिद खान यांचे कोरोनाने निधन झाले. आता त्यांची आई रजीना खान यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाजिद खान यांची आई रजीना खान यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना मुंबईतील सुराणा सेठिया रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रूग्णालयात गायक-संगीतकार वाजिद खान यांनादेखील दाखल करण्यात आले होते. 

रिपोर्टनुसार, वाजिद यांची देखभाल करण्यासाठी रजीना या रूग्णालयातच थांबल्या होत्या. यादरम्यान त्या कोरोना रूग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. त्यामुळे त्यांनाही कोरोनाचे संक्रमण झाले. रजीना यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बीएमसीने आता रूग्णालयातील सर्व रूग्णांची कोरोना टेस्ट करायला सांगितले आहे. 

वाजिद खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केला होता. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, प्रीती जिंटासहित अन्य कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वाजिद यांनी अभिनेता सलमान खानसाठी अनेक गाणी बनवली. सलमान खानने एक भावूक ट्विट करत लिहिलं आहे, 'वाजिदसाठी नेहमी खूप सारं प्रेम, सम्मान. तू नेहमी लक्षात राहशील, एक व्यक्ती म्हणून आणि तुझ्या टॅलेंटसाठीदेखील. तुला खूप प्रेम. तुझ्या सुंदर आत्म्याला शांती मिळो.'

View this post on Instagram

Eid mubaraq n our prayers n salaam to ur fmly 🙏

A post shared by Sajid And Wajid (@thesajidwajid) on