Thu, Mar 21, 2019 09:12होमपेज › Soneri › कोल्‍हापुरी चप्‍पल पोहोचलं मराठी बिग बॉसच्‍या घरात 

कोल्‍हापुरी चप्‍पल मराठी बिग बॉसच्‍या घरात 

Published On: Apr 16 2018 5:08PM | Last Updated: Apr 16 2018 5:12PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मराठीत पहिल्यांदाच होणाऱ्या बिग बॉसच्या सीझनची सुरुवात आजपासून होत आहे. मराठी सेलिब्रेटी आणि दिग्गज कलाकारांची वर्णी बिग बॉसच्या घरात लागणार आहे. आता मराठी बिग बॉसच्‍या घर (सेट) तयार करून झालं आहे.

Related image

(file pic)

बिग बॉस या रिॲलिटी शोचे घर मराठमोळ्‍या लुकमध्‍ये दिसणार आहे. विशेष म्‍हणजे, त्‍या घरात मोठी कोल्‍हापूरी चप्‍पलाची प्रतिकृती पाहायला मिळालीय. 

तसं म्‍हटलं तर, त्‍या घरात जिम, स्‍वयंपाक घर, हॉल, डायनिंग रूमदेखील आहे. तर कोंबड्‍यांची प्रतिकृती आणि नाकातली मोत्‍यांची नथ देखील आकर्षण ठरतयं. 

जय मल्हार' मालिकेतील खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहचलेला लाडका अभिनेता देवदत्त नागे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये झळकण्याची शक्यता आहे.

Image result for devdatta nage

आणखी काय काय आहेत, मराठी बिग बॉसच्‍या घरात? हे पाहण्‍यासाठी हा रिॲलिटी शो तुम्‍हाला पाहावा लागेल. 

Image may contain: 1 person, smiling
दरम्‍यान, मराठी बिग बॉसचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करताहेत, हे पक्‍क झालयं. त्‍याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता आस्ताद काळे, अभिनेता विकास पाटील, पुष्कर जोग, राजेश श्रुंगारपुरे, अभिनेत्री रेशम टिपणीस यांची वर्णी लागण्‍याची शक्‍यता आहे.

शिवाय, सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, 'फू बाई फू' फेम आणि पहिल्या पर्वाची विजेती विशाखा सुभेदार, ही बिग बॉसच्या घरात येणार असल्‍याची माहिती आहे. 


विशाखा यांनी 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. तसेच 'जय मल्हार' मालिकेतील खंडोबाची  व्यक्तीरेखा ज्‍याने साकारली आणि त्‍याच भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला आपला सर्वांचा लाडका अभिनेता देवदत्त नागे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये दिसण्‍याची शक्‍यता आहे. 

(photos : twitter)