Tue, Jun 25, 2019 15:13होमपेज › Soneri › हार्दिक पांड्‍याच्‍या कॉमेंट्‍सवर भडकली 'ही' अभिनेत्री

हार्दिक पांड्‍याच्‍या कॉमेंट्‍सवर भडकली 'ही' अभिनेत्री

Published On: Jan 12 2019 3:10PM | Last Updated: Jan 12 2019 3:10PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात भाग घेणे महागात पडले. या चॅट शोमध्‍ये दोघांनी बेताल वक्‍तव्ये केल्‍यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्यानंतर सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका होत आहे. आता एका अभिनेत्रीने हार्दिक पांड्याच्‍या कॉमेंट्सवर सोशल मीडियावर टीका केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कोइना मित्राने सोशल मीडियावर लिहिलयं, 'कॉफी विथ करणमध्‍ये सुपर चीप हार्दिक पांड्याचे  कॉमेंट्स ऐकले. हे पूर्णपणे, मूर्खता आणि दिखावा होता. मी माझ्‍या आई-वडिलांना धन्‍यवाद देते की, त्‍यांनी मला शाळेत पाठवले. शिक्षण दिले. आमच्‍या इंडियन जर्सी आणि इंडियन क्रिकेटर्सचे असा अपमान नको.' 

अधिक वाचा : 'बायको आणि मुलगी सोबत असल्‍यास पांड्‍यासोबत अजिबात जाणार नाही'

कोइना मित्रा सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्‍ह असते. ती राजकीय मुद्‍द्‍यांवरही आपले स्‍पष्‍टपणे आपले मत मांडते. 

कोइना मित्रा हिंदीबरोबरच तमिळ आणि बंगाली चित्रपटांमध्‍ये काम केले आहे. परंतु, चुकीची सर्जरी झाल्‍याने कोइनाच्‍या करिअरला ब्रेक लागला. तिने एका मुलाखतीत म्‍हटले होते की, चुकीच्‍या सर्जरीमुळे तिच्‍या शरीरातील हाडे फुगली होती.