Sun, Dec 15, 2019 04:47होमपेज › Soneri › जेम्स बॉण्ड फेम अभिनेते ब्रायन मार्शल काळाच्या पडद्याआड 

जेम्स बॉण्ड फेम अभिनेते ब्रायन मार्शल काळाच्या पडद्याआड 

Published On: Jun 26 2019 4:25PM | Last Updated: Jun 26 2019 4:54PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जेम्स बॉण्ड फेम अभिनेते ब्रायन मार्शल यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. ब्रिटीश अभिनेते ब्रायन मार्शल यांनी द स्पाय हू लव्ह मी (The Spy Who Loved Me) (१९७७) या चित्रपटात कमांडर टाल्बोटची (Commander Talbot) भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका फार गाजली.

ब्रायन मार्शल यांच्या निधनाच्या वृत्ताला मार्शल यांचे एजंट Esta Charkham (from ECA) यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे-

"A wonderful actor - he was so good you never noticed how good he was. 

"He was a valued chum. His credits are a catalogue of classic British and Australian TV.

"Fare Forward Dearest Bryan."

मार्शल यांचा जन्म बॅटरसी (Battersea) लंडन येथे झाला होता. त्यांनी १९६० च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात केली होती.