होमपेज › Soneri › भारत पाक ‘फायनल’ दरम्यान ‘जब हॅरी मेट सेजल’ चा मिनी ट्रेलर

भारत पाक ‘फायनल’ दरम्यान ‘जब हॅरी मेट सेजल’ चा मिनी ट्रेलर

By | Publish Date: Jul 21 2017 1:50PM

नवी दिल्‍ली: पुढारी ऑनलाईन

आयसीसी चॅंम्पियंस ट्रॉफीच्या भारत-पाक अंतिम सामन्यात शाहरुख खान आणि अनुष्का शर्माचा अभिनय असलेल्या इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचा मिनी ट्रेलर रिलीज होणार आहे.

शाहरुख खान या चित्रपटाचा ट्रेलर सलमानच्या ‘ट्युबलाईट’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी रिलीज करणार आहे. पण त्या आधीच ‘जब हॅरी मेट सेजल’चा मिनी ट्रेलर आजच्या भारत-पाक फायनल सामन्यादरम्यान एका व्हिडिओ गाण्यासह क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.

शाहरुख खान आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यासाठी नवनवीन फंडे शोधत असतो. याआधी त्याने ‘रईस’च्या प्रमोशनसाठी मुंबई ते दिल्ली असा रेल्वे प्रवास केला होता. ‘जब हॅॅरी मेट सेजल’चा २ मिनिटांचा हा मिनी ट्रेलर आज भारत-पाक ‘फायनल’ सामन्यावेळी प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करेल.