Fri, Nov 24, 2017 20:07होमपेज › Soneri › आयफा पुरस्‍कार वितरण सोहळा

आयफा पुरस्‍कार वितरण सोहळा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन

आयफा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन यावर्षी न्‍यूयॉर्कमध्ये करण्यात आले आहे. बॉलीवुडचे अनेक कलाकार या सोहळ्यासाठी उपस्थित असून उद्घाटन समारंभात त्यांनी आपली अदाकरी सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यात संगीत क्षेत्रातील 25 वर्षांच्या योगदानासाठी बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना विशेष पुरस्काराने सन्‍मानीत करण्यात आले. तर अभिनेत्री तापसी पन्‍नूला वुमेन ऑफ द ईयर ने गौरविण्यात आले.

त्याचबरोबर इतर पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. यामध्ये अभिनेत्री दिशा पाटनी हीला ‘एमएस धोनीः  द अनटोल्‍ड स्टोरी  स्‍टोरी’या चित्रपटासाठी ‘बेस्‍ट फीमेल डेब्यू एक्‍टर’ हा ॲवार्ड मिळाला. 

अभिनेत्री आलिया भट्ट हिला ‘स्‍टाईल आयकॉनचा’ अवॉर्ड मिळाला. उडता पंजाब या चित्रपटासाठी  कनिका कपूरला आणि  एयरलिफ्ट या चित्रपटासाठी तुलसी कुमारला  ‘बेस्‍ट फिमेल प्‍लेबैक सिंगर’ म्हणून ॲवार्ड मिळाला आहे.
 नीरजा ' या चित्रपटामध्ये नकारात्‍मक भुमिका साकारणारा अभिनेता जिम सरभ याला ‘बेस्‍ट ॲक्‍टर इन निगेटिव रोल’ असा अवॉर्ड मिळला आहे. अभिनेता वरूण धवनला' ढिशूम ' साठी ‘बेस्‍ट कॉमिक ॲक्‍टर’ हा ॲवॉर्ड मिळाला.

‘चन्‍ना मेरेया’ या ' ऐ दिल है मुश्किल ' या चित्रपटातील या गाण्यासाठी अमिताभ भट्टाचार्य यांना बेस्‍ट गीतकार हा अवॉर्ड मिळाला. याच चित्रपटाच्या संगितासाठी प्रीतम याला बेस्‍ट संगीतकार अवॉर्ड मिळाला. गायक अमित मिश्राला बेस्ट प्लेबॅक सिंगर चा ॲवार्ड मिळाला.