होमपेज › Soneri › मेलबर्नमध्ये एेश्वर्याने फडकवला तिरंगा 

मेलबर्नमध्ये एेश्वर्याने फडकवला तिरंगा 

Published On: Aug 12 2017 2:54PM | Last Updated: Aug 12 2017 4:41PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाइन

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ऑस्ट्रेलियातील ‘आयएफएफएम’ मध्ये सहभागी झाली आहे. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात मेलबर्नच्या फेडरेशन चौकात आज तिने तिरंगा फडकवला. ऐश्वर्यासोबत छोटी आराध्याही होती. या वेळी दोघींचे पारंपरीक ड्रेस लक्ष वेधून घेत होते. 

परदेशात जाऊन तिरंगा फडकवण्याचा बहुमान मिळालेली ऐश्वर्या राय पहिलीच अभिनेत्री आहे. तिरंगा फडकवल्यानंतर एैश्वर्याने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हा मान दिल्याबद्दल सर्वांचे आभारही मानले. हा सन्मान मी आयुष्यभर लक्षात ठेवेन असेही ती म्हणाली. 

भारतीय स्वातंत्र्याला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मेलबर्नमध्ये ‘सेलेब्रेटिंग इंडिया ॲट ७०’या विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे. ‘आयएफएफएम’ हा ऑस्ट्रेलियामध्ये होणारा भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वांत मोठा वार्षिक समारंभ आहे. या कार्यक्रमात ऐश्वर्या राय-बच्चनला चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी सन्मानित केले जाणार आहे.