पतीची देखभाल करताना पत्नीही झाली कोरोनाबाधित

Last Updated: Mar 23 2020 4:38PM
Responsive image


नवी दिल्ली :  पुढारी ऑनलाईन 

हॉलिवूड अभिनेता इदरिस एल्बाची पत्नी सबरीना हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. एल्बाची देखभाल करण्यासाठी सबरीना त्याच्याजवळ होती. त्यामुळे तिला देखील लागण झाली. 

पतीच्या देखभालीसाठी तिनं केलं धाडस 

सबरीना म्हणाली की, कोरोनाची लागण झाल्यानंतर देखील ती आपल्या पतीपासून दूर गेली नाही. कारण, सबरीनाला एल्बाची देखभाल करायची होती. एल्बाच्या पत्नीला अद्याप कोरोनाची लक्षणे नाहीत. एल्बाने टेस्ट केले, जेव्हा तिला समजलं की, कोरोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीच्या ती संपर्कात आली होती. एल्बाने तत्काळ तपासणी करून घेतली. त्यावेळी तिचे टेस्ट पॉझिटिव्ह आले. एल्बालाही कुठलेही लक्षण दिसले नव्हते. परंतु, त्याला आयसोलोट व्हावे लागले होते. इदरिस एल्बाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली होती. 

वाचा - कुठलीही लक्षणे नसताना 'या' हॉलिवूड अभिनेत्याला कोरोनाची लागण 

एल्बाने आपल्या पत्नीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. एल्बा म्हणाला, माझी पत्नी माझ्यासोबत होती. माझी इच्छा नव्हती की, उपचार सुरू असताना तिने माझ्यासोबत राहावे. मी तिच्या खूप प्रेम करतो. आणि कदाचित मला तिच्यासोबत राहता आलं असतं. आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय केला. आणि धाडसाने रहिलो. आपण समजून घ्याल, अशी अपेक्षा करतो.

याआधी एल्बाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते, 'आज सकाळी सकाळी मला समजलं की, मी Covid-१९ पॉझिटिव्ह आहे.  मी आता ठिक आहे. आणि आता मला कोणतेही लक्षण दिसत नाही. मी आयसोलेट झाले आहे. सर्व लोकांनी घरी राहावे. तार्किक बना. घाबरण्याची गरज नाही. मी माझ्या आरोग्याबद्दल अपडेट देत राहीन.'