Sun, May 26, 2019 15:33होमपेज › Soneri › ह्रतिक-सुजैन पुन्हा एकत्र?

ह्रतिक-सुजैन पुन्हा एकत्र?

Published On: Jun 14 2018 12:29PM | Last Updated: Jun 14 2018 12:29PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडची क्वीन कंगणा रानावत हिच्यासोबतच्या वादामुळे चर्चेत असणारा बॉलिवूड स्टार अभिनेता ह्रतिक रोशन पुन्हा एका नव्या कारणाने प्रकाशझोतात आला आहे. गेल्‍या काही दिवसांपासून त्‍याची घटस्‍पोटीत पत्‍नी सुजैन आणि तो अनेक वेळा एकत्र पाहायला मिळाल्‍याने ते दोघे मागचे सर्व विसरून एकत्र येणार असल्‍याच्या चर्चा बी टाउनमध्ये जोर धरत आहेत. 

नुकतेच ह्रतिक पत्नी सुजैन आणि मुलांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्या दरम्यान चित्रपटगृहातून हे सर्व बाहेर पडताणाचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमुळे हृतिक आणि सुजैनचा मोडलेला संसार पुन्हा जुळला असल्‍याच्या चर्चा रंगू लागल्‍या आहेत. 

India Tv - Hrithik Roshan and Sussanne Khan

India Tv - Hrithik Roshan and Sussanne Khan

Ex वाइफ सुजैन संग मूवी डेट पर निकले ऋत‍िक रोशन, PHOTOS

सुजैन आणि ह्रतिक यांच्यात डिव्होज झाला असला तरी दोघांनी त्यांच्या मुलांना त्याच्यामधील दुरावलेल्या नात्याची झळ कधीच पोहचू दिली नाही. मुलांचा वाढदिवस एकत्रित साजरे करणे, कार्यक्रमांना हजेरी लावणे, अशा कारणांतून हृतिक आणि सुजैन बऱ्याच वेळा एकत्र येत असतात. गेल्‍या दोन महिन्यात हृतिक सह कुटुंब गोव्याला फिरायला गेला होता. त्‍यावेळीही हे पती पत्‍नी पुन्हा एकत्र आल्‍याची चर्चा रंगली होती.  

Hrithik Roshan and Sussanne Khan

दरम्‍यान, ह्रतिक सध्या त्‍याच्या आगामी ‘सुपर 30’ या चित्रपटाच्या शुटिंग मध्ये बिझी आहे.