'या' हॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांचा कोरोनाने मृत्यू  

Last Updated: Mar 23 2020 3:28PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. इटली, अमेरिका, चीन आणि इराण या देशांतील अनेक लोकांचा  जीव गेला आहे. आता हॉलिवूड अभिनेत्री सोफिया माइल्सच्या वडिलांचा कोरोनाने जीव घेतला आहे.

ट्रान्सफार्मर्स आणि मॅन्सफील्ड पार्क यासारख्या चित्रपटात काम करणाऱ्या सोफियाचे वडील पीटर माइल्स यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. सोफियाने सोशल मीडियावर ही माहिती देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सोफियाने ट्विट करून लिहिले की- रेस्ट इन पीस पीटर माइल्स. माझ्या प्रेमळ वडिलांचे निधन काही तासांपूर्वी झाले. कोरोना विषाणूने माझ्या वडिलांचा जीव घेतला. 

यापूर्वी, सोफीने ट्विटरवर आपले वडील आणि भावासोबत एक फोटो शेअर केला होता. आणि कॅप्शनमेध्ये लिहिलं होतं-माझे वडील, माझा भाऊ आणि मी, एक आठवणीतील फोटो. याआधी सोफीने उपचार घेतानाचा आपल्या वडिलांचा फोटो शेअर केला होते. ती आपल्या वडिलांच्या शेजारी मास्क आणि हँड ग्लोज घालून उभी होती.