Tue, Sep 17, 2019 21:58होमपेज › Soneri › बर्थडे स्‍पेशल : दिशा स्‍वत:ला अशी ठेवते फिट 

बर्थडे स्‍पेशल : दिशा स्‍वत:ला अशी ठेवते फिट 

Published On: Jun 13 2019 1:17PM | Last Updated: Jun 13 2019 1:17PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा १३ जूनला २६ वा वाढदिवस. ती आपल्‍या अभिनयाबरोबर फिटनेसबद्‍दल नेहमी चर्चेत राहते. दिशा स्‍वत:ला फिट ठेवण्‍यासाठी खूप मेहनत घेते. दिशाचे भारत या चित्रपटातील स्‍लो मोशन हे गाणे हिट  ठरले आहे. या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकली. भारतने १०० कोटींचा गल्‍ला पार केला असून बॉक्स ऑफिसवर कमाई सुरुच आहे. दिशाच्‍या फिटनेसविषयी तुम्‍हाला माहिती आहे. तिच्‍या फिटनेस सीक्रेटविषयी जाणून घेऊया. 

Image result for disha patani instagram

दिशाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'ती रोज वर्कआउट करते. कधी जिम जाणे चुकवत नाही. ती निश्चित करते की, रोज आपला वर्कआउट पूर्ण करते. पाऊस असो वा ऊन वर्कआउट करण्‍यागसाठी जिमला जातेच.'

Image result for disha patani instagram

दिशा अनेक एक्सरसाईज मिक्स करते. त्‍याची सुरुवात कार्डियोशी होते. त्‍याचबरोबर ती डान्‍सिंग, जिमनॅस्टिक आणि किक बॉक्सिंग करते. संध्‍याकाळी ती वेट लिफ्टिंग करते. 

दिशा आठवड्‍यामध्‍ये ४ दिवस जिम जाते. ती सकाळी १ तास योगादेखील करते. 

Image result for disha patani instagram

दिशाने एका मुलाखतीत म्‍हटले होते, एब्स बनवणे आणि ते कायम ठेवणे आव्‍हानात्‍मक असते. एक दिवस असतात आणि दुसर्‍या दिवशी ते जाऊही शकतात. त्‍यामुळे ती एब्ससाठी वेगळा वर्कआउट करते. एब्स कायम ठेवण्‍यासाठी वर्कआउटसोबत हेल्दी डाएट असणे खूप गरजेचे आहे. 

Image result for disha patani instagram

ब्रेकफास्ट

दिशा ब्रेकफास्टमध्‍ये २-३ अंडी, टोस्ट, दूध आणि ज्‍युस घेते. कधी-कधी एक बाउल ओट्‍स आणि दूधही घेते. ताजी फळे आणि ज्‍यूस आपल्‍या लंच आणि डिनरमध्‍ये घेते. तसेच व्‍हेजीटेबल सॅलड, ब्राउन राइस, डाळ घेते. बदाम आणि शेगदाणेही खाते. 

लंच

दिशा लंचमध्‍ये अधिक मात्रामध्‍ये प्रोटीन घेते. तिला भात आणि चिकन खाणे आवडते. 

डिनर

डिनरमध्‍ये अधिक प्रोटीन असणारे पदार्थ खाणे ती पसंत करते. त्‍यामध्‍ये एक बाउल अंडे आणि भरपूर पाणी पिते. त्‍यामुणे दिवसभर तिचे शरीर हायड्रेट राहते. 

Image result for disha patani instagram

दिशाचे डेली रुटीन

दिशा रोज ८ तास झोप घेते. त्‍यामुळे एक्सरसाईज करताना तिला हेल्दी रिझल्ट मिळतात. त्‍याचबरोबर, ती दिवसभर एनर्जीने भरपूर राहते. 

दिशा रोज खूप पाणी पिते. मेटाबॉलिज्म ठिक ठेवण्‍यात आणि जेवण पचवण्‍यासाठी पाणी मदत करते. 

दिशा कधीही आपले डाएट मिस करत नाही. काही फिटनेस लव्‍हर दिवसभरात ५ वेळा खातात. त्‍यामुळे तिचे पोट दिवसभर भरलेले असते. 

 

View this post on Instagram

🍒

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

💪🏽

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on