Tue, Oct 24, 2017 16:53
29°C
  Breaking News  

होमपेज › Soneri › oh! शाहरुख गाईडचं काम करतोय म्‍हणे?

oh! शाहरुख गाईडचं काम करतोय म्‍हणे?

By | Publish Date: Jul 21 2017 1:52PM

जोधपुर : पुढारी ऑनलाइन 

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने जोधपुरच्‍या मेहरानगढवर भ्रमंती केली. यावेळी जोधपुर टूरिस्ट गाइड असोसिएशनने बॉलीवुडचा बादशहा शाहरुख खानला गाईडची उपाधी प्रदान केली आहे. असोसिएशनच्‍या पदाधिकार्‍यांनी शाहरुखला साफा (फेटा) बांधून गाईडचा परवाना दिला. 

यावेळी शाहरुख गाईडच्‍या भूमिकेत दिसला. गाईडची भूमिका साकारण्‍यासाठी शाहरुख मेहरानगढ किल्‍ल्याच्‍या ठिकाणी पोहोचला. येथे काही पर्यटकांना 'खम्‍मा घणी' म्‍हणत त्‍याने गप्पाही मारल्‍या. मेहरान गढचे सौंदर्य न्‍याहाळल्‍यानंतर शाहरुखने इतर गाईंडकडून किल्‍ल्‍याची आणि संपूर्ण शहराची माहिती जाणून घेतली. यानंतर शाहरुख तेथून थेट विमानतळावर पोहोचला. 

दरम्‍यान, शाहरुख येथे फिरण्‍यासाठीच आला होता, असे समजते. यानंतर त्‍याने ट्‍विट करुन काही फोटोज शेअर केले आहेत. 'गाईडच्‍या रुपात मी माझे काम सुरु केले आहे. खम्‍मा घणी...' असे शाहरुखने ट्‍विटवरुन म्‍हटले आहे.