Mon, Nov 20, 2017 17:22होमपेज › Soneri › आगामी चित्रपट १०२ नॉट ऑऊटमधील फर्स्ट लुक

१०२ वर्षांचे झाले अमिताभ! 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा
ऋषि कपूर ७५ वर्षांच्‍या वृध्‍दाच्‍या भूमिकेत


मुंबई : 

बॉलीवूडचे स्‍टर बिग बी अमिताभ १०२ वर्षांचे झाले आहेत. आपला आगामी चित्रपट १०२ नॉट ऑऊटमध्‍ये बिग बी १०२ वर्षांच्‍या वृध्‍दाची भूमिका करत आहेत. तर त्‍यांच्‍या मुलाची भूमिका ऋषि कपूर करत आहेत. ऋषि कपूर ७५ वर्षांच्‍या वृध्‍दाच्‍या भूमिकेत दिसणार आहेत. दोघांचाही फर्स्ट लुक जारी करण्‍यात आला आहे. 

पीकू, शमिताभ, तीन यासारख्‍या चित्रपटांमध्‍ये जवळपास आपल्‍या वयाच्‍याच भूमिका केल्‍या  होत्‍या. मात्र १०२ नॉट ऑऊटमध्‍ये ते आपल्‍या वयापेक्षा ३० वर्षांनी मोठ्‍या असलेल्‍या वृध्‍दाची भूमिका करत आहेत. 

हा चित्रपट सौम्या जोशी यांच्‍या नावाने आलेल्‍या एका गुजराती प्लेवर आधारित आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. ओह माय गॉड आणि ऑल इज वेल यासारखे चित्रपटांचे दिग्‍दर्शन करणारे उमेश शुक्ला या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करत आहेत. 

ऋषि कपूर यांनीदेखील आपल्‍या वयापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्‍या वृध्‍दाची भूमिका केली आहे. मात्र, यापुर्वी कपूर ॲण्‍ड सन्‍समध्‍ये ऋषि कपूर यांनी ९० वर्षांच्‍या वृध्‍दाची भूमिका पार पाडली आहे. सोनेरी पडद्यावर भाऊ आणि मित्र म्‍हणून अभिनय केलेल्‍या अमिताभ बच्‍चन आणि ऋषि कपूर वडिल आणि मुलाच्‍या भूमिकेत दिसणार आहे.