Mon, Aug 19, 2019 10:03होमपेज › Soneri › हॉलिवूडच्‍या 'द नन'वर 'स्‍त्री'ची मजबूत पकड 

हॉलिवूडच्‍या 'द नन'वर 'स्‍त्री'ची मजबूत पकड 

Published On: Sep 12 2018 12:48PM | Last Updated: Sep 12 2018 12:49PM'स्‍त्री'ने मागे टाकले 'या' हॉलिवूडपटाला 

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

हॉलीवूड हॉरर चित्रपट 'द नन'ने जगभरातल्‍या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'द नन' कंज्युरिंग फ्रँचाइजीचा पाचवा चित्रपट आहे. परंतु, त्‍याचवेळी स्‍त्री रिलीज झाला होता. भारतीय बॉक्‍स ऑफिसवर 'स्‍त्री'ने 'द नन ला' टक्‍कर दिलीय. 

चित्रपटाने आठवड्‍याच्‍या शेवटी चांगला गल्‍ला जमवला. फोर्ब्सच्‍या रिपोर्टनुसार, १५८.४ कोटी बजेटमध्‍ये बनलेल्‍या ‘द नन’ने पहिल्‍या वीकेंडमध्‍ये वर्ल्डवाईड ९४३.२ कोटी रुपये कमावलेत. 

भारतात ‘द नन’ने ओपनिंग वीकेंडमध्‍ये एकूण २८.५० कोटींचा गल्‍ला जमवलाय,  अशी माहिती ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी माहिती दिलीय.  

'द नन' सोबतच भारतीय बॉक्स ऑफसवर तीन चित्रपट रिलीज झाले. 'पलटन (Paltan)', 'लैला मजनू (Laila Majnu)' आणि 'गली गुलिया' या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. जन्माष्टमीच्‍या औचित्‍याने रिलीज झालेला चित्रपट 'स्त्री' बॉक्‍स ऑफिसवर यशस्‍वी ठरला. 'स्त्री' आणि 'द नन' दोन्‍ही हॉरर चित्रपट आहेत.  

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री (Stree)'ने ओपनिंग केल्‍यानंतर दुसर्‍या रविवारी ९.८८ कोटींचे कलेक्शन केलं. तरण आदर्श यांच्‍या माहितीनुसार, आतापर्यंत ८२ कोटी रु. कमावण्‍यात यशस्‍वी झालेला 'स्त्री' १०० कोटींच्‍या क्‍लबमध्‍ये सहभागी होण्‍यास तयार आहे. 

'स्त्री'ने पहिल्‍या आठवड्‍यात ३२.२७ कोटी रुपये कमावलेत. दुसर्‍या आठवड्‍यातले कलेक्शन २१.९० कोटी रु. होतं. या चित्रपटाला वर्ल्ड ऑफ माउथ पब्लिसिटीचा फायदा मिळाला आणि रिलीज झाल्‍यानंतर १० दिवसांत ८२.२९ कोटींचा बिझनेस करण्‍यात यशस्‍वी ठरला. 'स्त्री'चं बजेट केवळ २० कोटींचं होतं.