Thu, Mar 21, 2019 09:30होमपेज › Soneri › ‘मी पण सचिन’! येतोय १ फेब्रुवारीला (Video)

‘मी पण सचिन’! येतोय १ फेब्रुवारीला (Video)

Published On: Nov 09 2018 5:56PM | Last Updated: Jan 30 2019 4:24PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सचिन.... हे नाव घेतले की, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर! भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. भारताच्या प्रत्येक गल्ली बोळ्यात आपल्याला असे अनेक महत्वाकांक्षी सचिन दिसून येतील, कि ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकले आहे.

नुकताच 'मी पण सचिन' या  सिनेमाचा पोस्टर सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं.या सिनेमात मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी झळकणार आहे. पोस्टरवर  स्वप्नील जोशी आपल्याला क्रिकेट किटमध्ये म्हणजेच क्रिकेट हेल्मेट घालून दिसत आहे आणि याच पोस्टरवर (Don't Stop Chasing Your Dream) 'आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे थांबवू नका,' अशी टॅगलाईन सुद्धा दिसून येत आहे.

गणराज असोसिएटसने आतापर्यंत अनेक चित्रपटांची प्रस्तुती आणि निर्मिती केली आहे, ज्यामध्ये 'मी पण सचिन' या चित्रपटाचा देखील समावेश होत आहे. विशेष म्हणजे, मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव यात लेखक आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. पोस्टरमध्ये स्वप्नील जोशी आपल्याला एका दमदार क्रिकेटपटू सारखा दिसून येत आहे. आणि पोस्टरवर असणारी टॅग लाईन सुद्धा प्रेक्षकांची अपेक्षा उंचावणार यात काही वाद नाही. हा सिनेमा भविष्यात सचिन होऊ इच्छिणाऱ्या एका महत्वाकांक्षी क्रिकेटपटूवर आधारित आहे का? असा प्रश्न पडतो. शिवाय स्वप्नील जोशी यात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे देखील गुपित आहे. गणेश गीते व नीता जाधव यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या नववर्षात १ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या भेटीला येत आहे. हा सिनेमा भारतातील क्रिकेटवेड्या तरुणाईंचे भावविश्व मांडणारा ठरेल अशी आशा आहे.