Tue, Nov 19, 2019 12:51होमपेज › Soneri › दोस्ताना-२ मध्ये 'या' क्यूट कपलची एन्ट्री 

दोस्ताना-२ मध्ये 'या' क्यूट कपलची एन्ट्री 

Published On: Jun 27 2019 5:41PM | Last Updated: Jun 27 2019 5:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन स्टारर दोस्ताना सिनेरसिकांच्या पसंतीला उतरला. आता या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची तयारी सुरू आहे. करण जोहर आज २७ जूनला काहातरी घोषणा करणार होता. व्हिडिओ शेअर करून त्याने ही माहिती दिली होती. या व्हिडिओवरून हिंट मिळत आहे की, ही घोषणा दोस्तानाशी  संबंधित आहे. आता करण जोहरने स्टारकास्टचा खुलासा केला आहे. 

चित्रपटात जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन दिसणार आहेत. कार्तिक-जान्हवीशिवाय तिसरा स्टार कोण असणार, हे त्याने सांगितलेले नाही. तिसरा स्टार न्यूकमर असणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

दोस्ताना -२ हा २००८ मध्ये आलेला दोस्तानाचा सीक्वल असू शकतो. दोस्ताना तरण मनुसुखानीने दिग्दर्शित केला होता. दोस्ताना-२ मध्ये आलिया भट्टला मुख्य भूमिका मिळणार आहे, असे म्हटले जात होते. परंतु, करण जोहरने ही अफवा असल्याचे सांगितले.