Fri, May 24, 2019 16:29होमपेज › Soneri › सलमानचा 'हा' नवा लुक पाहण्‍यासारखा! 

सलमानचा 'हा' नवा लुक पाहण्‍यासारखा! 

Published On: Apr 18 2019 7:02PM | Last Updated: Apr 18 2019 7:02PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सलमान खान सध्‍या आपला आगामी चित्रपट 'भारत'च्‍या शूटिंगमध्‍ये बिझी आहे. 'भारत'मधील लुकमुळे सलमान सध्‍या चर्चेत आहे. आता कॅटरीनाचीही चर्चा होत आहे. सलमान खान या चित्रपटातील पहिला लुक रिलीज करण्‍यात आला आहे. त्‍यानंतर दुसरा लुक समोर आला. आता आणखी लुक सोशल मीडियावर रिलीज करण्‍यात आला आहे. 

विशेष म्‍हणजे, या पोस्‍टरमध्‍ये सलमानसोबत कॅटरीना कैफ दिसत आहे. खुद्‍द सलमानने आपल्‍या ट्‍विटर अकाऊंट्‍सवर हे लुक्‍स शेअर केले आहेत. 

पहिल्‍या पोस्टरमध्‍ये सन २०१० लिहिले आहे आणि सलमान खानचा एक ओल्‍ड लुक दिसत आहे. त्‍याचबरोबर त्‍याने कॅप्‍शनही लिहिली आहे-'जितके पांढरे केस माझ्‍या डोक्‍यावर आणि दाढीत आहेत, त्‍यापेक्षा अधिक रंगीन माझे आयुष्‍य आहे.' 

१६ एप्रिलला सलमान खानचा 'जवानी जानेमन' लुक रिलीज झाला होता. सलमान खानने 'भारत'चा जो पोस्टर शेअर केला, त्‍यामध्‍ये त्‍याचा यंग लुक दिसत आहे. सलमान खानने या फोटोला कॅप्शन लिहिली होती-'जवानी हमारी जानेमन थी.'

आता सलमातचा कॅटरीनासोबतचा एक पोस्‍टर शेअर केला आहे. या पोस्‍टरमध्‍ये १९७० असे लिहिले आहे. यात सलमान, मायनिंग वर्करच्‍या लुकमध्‍ये दिसणार आहे.