जगभरात छप्परफाड कमाई करणारा 'जोकर' पहिला R रेटेड चित्रपट

Last Updated: Nov 16 2019 3:01PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जाओकिवीन फोएनिक्स स्टारर चित्रपट जोकर या चित्रपटाने वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर १ अब्ज डॉलरची कमाई केली आहे. आर रेटेड मिळवणारा जोकर हा इतिहासातील पहिला चित्रपट ठरला आहे. याआधी रेयान रेनॉल्ड डेडपूल २ या चित्रपटाने ७८५ दशलक्ष डॉलरची कमाई केली होती. या चित्रपटाला मागे टाकत जोकरने कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. वॉर्नर ब्रॉस आणि डिसीचा हा चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.