Sat, Mar 23, 2019 00:04होमपेज › Soneri › रजनीकांत-अक्षयचा '२.०' यादिवशी होणार रिलीज

रजनीकांत-अक्षयचा '२.०' यादिवशी होणार रिलीज

Published On: Jul 11 2018 4:54PM | Last Updated: Jul 11 2018 4:54PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

सुपरस्‍टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट '२.०' यावर्षी २९ नोव्‍हेंबरला रिलीज होणार आहे. दिग्‍दर्शक शंकर यांनी काल दि. १० रोजी रात्री आपल्‍या या चित्रपटाच्‍या रिलीज डेटची घोषणा करत ट्‍विट केलं. बिग बजेट असणारा या चित्रपटाबद्‍दल शंकरने लिहिलयं, “Hi everyone.. at last the VFX companies promised the final delivery date of the VFX shots. The movie will release on Nov 29th 2018.”
रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्‍या अभिनयाने नटलेला हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वांत बिग बजेट असणारा चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय खलनायकाच्‍या भूमिकेत दिसणार आहे. 

'२.०' हा चित्रपट २०१० मध्‍ये आलेला रोबोट चित्रपटाचा सीक्वल आहे. त्‍यात रजनीकांत यांनी रोबोटची भूमिका साकारली होती. आता '२.०'मध्‍ये रजनीकांत पुन्‍हा रोबोटच्‍या रूपात दिसणार आहे. तर अक्षय राक्षसी बर्ट-मॅनच्‍या रुपात दिसणार आहे. अक्षयच्‍या माहितीनुसार, '२.०'मधला त्‍याची ही भुमिका आव्‍हानात्‍मक आहे. या लुकसाठी अक्षयला रोज पाच तासांचा वेळ लागला होता.