मरणाच्या दारी सहज फेरी मारणारा अभिनेता...

Last Updated: Apr 29 2020 4:32PM
Responsive image

इरफान खानची अकाली एक्झिट झाली असली तरी त्याची चाहूल त्याला लागली होती. याची कल्पना इरफानने वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना दिली होती. त्याच्या मनात नेमकं काय चाललं असेल हे सांगता येणार नाही. पण त्याच्या मनातील व्यक्त-अव्यक्त भावनांचा हा कोलाज त्याच्याच सोशल मीडियावरील विविध पोस्टवरुन....


मरणाच्या आदल्या दिवशी आपला श्वास अनिश्चित काळासाठी सुरू आहे याची जाणीव झाली अन् ट्विटरवर नोटिफिकेशनची बेल वाजली. माझा जीव वाचण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या दुवा आणि प्रार्थनांची गूंज माझ्या कानी पडत होती. 

यावेळी मला माझ्या अनेक पोस्टची आठवण झाली. ती होती लंडनमधील उपचारादरम्यानची. कधी-कधी तुम्‍ही जगता आणि कधी तुम्‍हाला वाटते की, तुमचं आयुष्‍य पूर्णपणे ढासळलेलं आहे. गेल्‍या १५ दिवसांत आयुष्‍य अनिश्चित असल्‍याचं जाणवत आहे. मला अंदाजदेखील नव्‍हता की दुर्मीळ कथांच्‍या शोधात मला दुर्मीळ आजार मिळेल. पण, मी कधी आशा सोडलेली नाही. मी संघर्ष करेन... पण कुठल्या जीवावर संघर्ष करणार मी या प्रश्नाचे उत्तरच अनुत्तरित राहील....

कदाचित नियतीला ठाऊक होते.. कारण आपसुक माझे शब्द माझ्या चाहत्यांना, हितचिंतकांना माझ्या मरणाची जाणीव करून देत असत... जणू माझे शब्दच नियतीला इशारा देत होते...

मी माझ्या चाहत्यांना नेहमी सोशल मीडियातील पोस्टमधून माझ्या मरणयातना सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ज्यावेळी 'अंग्रेजी मीडियम'चं शूटींग पूर्ण केले त्यावेळी अल्लाच्या अंतकरणातून मला हाक आली.. तू ये.... गहिवरलेलं मन हसरं ठेवत चाहत्यांना संदेश दिला..

मित्रांनो. मी आहे इरफान. मी आज तुमच्यासोबत आहेही आणि नाहीही. चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' फार खास आहे. खरं सांगायचं झालं तर माझी मनापासून इच्छा होती की, हा चित्रपट तेवढ्याच प्रेमाने प्रमोट करावा, जेवढ्या प्रेमाने आम्ही हा तयार केला आहे. परंतु, माझ्या शरीरामध्ये काही unwanted पाहुणे बसले आहेत. त्यांच्याशी सध्या चर्चा सुरू आहे. पाहुयात यातून काय साध्य होतंय. जे काही असेल त्यासंदर्भात तुम्हाला माहिती देण्यात येईल.'

'एक म्हण आहे... When life gives you lemons, you make lemon immediately. बोलायला चांगलं वाटतं, परंतु, खरंच जेव्हा आयुष्य तुमच्या हातात लिंबू देतं, त्यावेळी त्याचं सरबत तयार करणं अवघड असतं. तरीही पॉझिटिव्ह राहण्याव्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. सध्याच्या परिस्थितीत लिंबाचं सरबत तयार करू शकेल की, नाही. हे तुमच्या हातात आहे.'

मला माहिती आहे हा चित्रपट तुम्हाला नवीन गोष्टी शिकवेल, तुम्हाला हसवेल, रडवेल आणि पुन्हा एकदा हसवेल कदाचित.'

माझे हे शब्द ऐकताच माझ्या चाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या... तरही मी म्हणत होतो... मी संघर्ष करेन...

मी एकदा म्हटलं होतं आयुष्याचा काळ माझ्यासाठी एका रोलर-कोस्टर राईडसारखा आहे. यात आपण थोडे रडतो आणि अधिक हसतो, तसेच काही. या काळात मी भयंकर अस्वस्थता अनुभवली. पण कुठेतरी त्यावर नियंत्रणही मिळवले. मी माझ्या जवळच्या व्यक्तिंसाठी जगतो, जगतोय,’ पण कुठल्या जीवावर मी हे बोलतोय या प्रश्नाचं उत्तर मला अखेरपर्यंत मिळालं नाही.

खरंतर लंडनच्या उपचारादरम्यानच मी माझ्या मरणाची चाहुल माझ्या प्रियजनांना दिली होती... कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाची गॅरंटी नसते. मला असे वाटते की, मी आजारी आहे आणि काही महिन्यात किंवा एक-दोन वर्षात मरु शकतो. असे सांगत असताना चारही बाजूला अंधार असलेल्या रस्त्याने मी चालत आहे. आयुष्य मला काय देत आहे हे मी पाहू शकत नाही, असे म्हटले होते.. इतकेच नव्हे तर आयुष्य खूप रहस्यमयी आहे आणि खूप काही देते. आपण फक्त ते घेण्याचा प्रयत्न करत नाही. असे म्हटले होते... मी आता यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करतोय बस इतकंच....

खरंतर 'अंग्रेजी मीडियम'च्या शूटींग दरम्यानच मी माझे खरे मरण पाहिले होते.. पण मला काही क्षण का होईना तुमच्यासोबत जगायचे होते.. म्हणून इतके दिवस तडफडणाऱ्या माश्यासारखा तडफडत राहिलो... पण माझे हे तडफडणे माझ्या अंतःकरणाला असह्य झाले होते.. आणि मला त्याची सतत जाणीव होत होती... मला माफ करा कारण अखेर मी माझ्या अंतकरणाचा विचार केला...

मृत्यू अटळ असला तरी जोपर्यंत तो समोर दिसत नाही, तोपर्यंत तो जाणवतही नाही असे म्हणतात. खर सांगायचं झालं तर मरणाच्या दारी सहज फेरी मारणारा अभिनेता आणि सतत त्याचा प्रवास शब्दातून तुमच्यापर्यंत पोहचवणारा कदाचित एकमेव मी अवलिया असेन. 

त्यामुळे माझ्या मरणानंतर अकाली मृत्यू, अकाली एक्झिट असे शब्द वापरू नका... कारण मी माझ्या प्रत्येक शब्दातून माझ्या जाण्याची चाहूल देत होतो... आणि देत राहिलो.....

पण तरही मी तुमच्या मनातून म्हणत आहे मी संघर्ष करेन...

शब्दांकन - धनश्री ओतारी

शिराळा : ८१ वर्षाच्या वृद्धाला कोरोना; मणदूर गावात शुकशुकाट


'तो' कोरोना रुग्ण गेला कुणीकडे? केईएम प्रशासनाचा निष्काळजीपणा सुरुच!


'कोरोना अदृष्य पण, त्याचा सामना अपराजित कोरोना वॉरियर्सशी'


तुम्ही एकटे नाही! अमेरिकेतील आंदोलनाला गुगलचा खंबीर पाठिंबा


नागपूरातील कोरोना कंट्रोलचा मुंडे पॅटर्न; अर्ली ट्रेसिंग, मास क्वारंटाईन, टीम मॅनेजमेंट


तब्बल ८ पावसाळी नक्षत्रांची सुरुवात रविवारीच! 


संगीतकार वाजिद यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?


सातारजवळ एकाचा डोक्यात दगड घालून खून


पाससाठी तब्बल २३ वेळा अर्ज करणारा बहाद्दर सापडला जाळ्यात!


पुण्यात बाधितांची वाटचाल आठ हजारांकडे