Sat, Aug 24, 2019 18:51होमपेज › Soneri › ऐश्‍वर्या रायच्‍या मीमवर विवेकचा माफीनामा  

ऐश्‍वर्या रायच्‍या मीमवर विवेकचा माफीनामा  

Published On: May 21 2019 11:19AM | Last Updated: May 21 2019 11:32AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने एक्‍झिट पोलवर ऐश्‍वर्या रायचे मीम शेअर केले होते. त्‍यानंतर, वाद निर्माण झाला होता. राष्‍ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेत विवेकला ओबेरॉयला नोटीस पाठवली आहे. वाद निर्माण झाल्‍यानंतर आता विवेकने माफी मागितली आहे. त्‍याने ऐश्‍वर्याचा शेअर केलेला फोटो ट्‍विटरवरून हटवला आहे. 

विवेक ओबेरॉयने एक्‍झिट पोलवर आक्षेपार्ह फोटो ट्‍विट केल्‍यानंतर त्‍याला कॉमेंट्‍सचा सामना करावा लागला होता. विवेकने ॲशचे एक मीम तयार केले होते. त्‍या मीममध्‍ये तीन फोटो होते. एक सलमान आणि ॲशचा. त्‍या फोटोला त्‍याने म्‍हटले होते, ओपनिंग पोल. दुसरा विवेक ओबेरॉय आणि ॲशचा. त्‍याला कॅप्‍शन होती-एक्‍झिट पोल आणि तिसरा अभिषेक बच्‍चन आणि ॲश, आराध्‍याचा. त्‍याला कॅप्‍शन लिहिली आहे - रिझल्‍ट.  

या मीमनंतर विवेक ओबेरॉयला टिकेला सामोरे जावे लागले, अनेक अभिनेत्रींनीही विवेकवर निशाणा साधला आहे. 

विवेक ओबेरॉय दीर्घकाळानंतर मोठ्‍या पडद्‍यावर वापसी करत आहे. उमंग कुमार दिग्‍दर्शित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या बायोपिकमध्‍ये मोदी यांची भूमिका विवेकने साकारली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे ५ एप्रिलला रिलीज होणारा चित्रपट आता २४ मे ला रिलीज होणार आहे. २० मे ला या चित्रपटाचे नवे पोस्‍टर रिलीज करण्‍यात आले होते. 

वाचा : जुनं दुखणं वर आलं : ऐश्वर्याचा फोटो पोस्ट करून वादात सापडला विवेक ओबेरॉय