Wed, Feb 26, 2020 09:39होमपेज › Soneri › आयुष्मान साकारणार 'स्त्री' पात्र  

आयुष्मान साकारणार 'स्त्री' पात्र  

Published On: Aug 19 2019 5:29PM | Last Updated: Aug 19 2019 5:29PM

 आयुष्मान खुरानामुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता आयुष्मान खुराणा 'ड्रीम गर्ल’ चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'ड्रीम गर्ल’ या चित्रपटात आयुष्मान एका नाटकात काम करणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे. एकता कपूरने या व्यक्तीरेखासाठी आयुष्मानची निवड का केली यांचा खुलासा केला.

‘ड्रीम गर्ल’ चित्रपटासाठी आयुष्मानने खूपच मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी आयुष्मानचीच का निवड केली याचा खूलासा ‘ड्रीम गर्ल’ची निर्माती एकता कपूरने केला.    'ज्यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मला या चित्रपटाची स्किप्ट वाचायला दिली तेव्हा मला त्याची कथा खूपच आवडली.

या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी प्रथम माझ्यासमोर फक्त अभिनेता आयुष्मान खुरानाचा चेहरा दिसला. कारण आयुष्मान हा उत्तम कलाकारासोबत एक चांगला व्हॉइस मॉड्युलेशन करणारा आहे. त्यामुळे या चित्रपटातील स्त्री व्यक्तीरेखा साकरण्यासाठी तो योग्य व्यक्ती असल्याचे मला वाटले. तसेच या चित्रपटातील स्त्री भूमिकेसाठी तो स्वत: ला झोकून देईल.'

एकता कपूर म्हणाली की, 'मला विश्वास होता की आयुष्मान कधीच या चित्रपटात कोणकोणते कलाकार आहेत याला महत्व देणार नाही. तो फक्त कथेला महत्व देईल. त्याने या चित्रपटाची कथा वाचली आणि या भूमिकेसाठी होकार दिला.'   

या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर आणि आशीष सिंह करत आहेत. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

(video, photo : ayushmannk instagram वरून साभार)