Sun, Jul 12, 2020 23:36होमपेज › Soneri › आर्थिक संकटातून पुन्हा उभारी घेतलेला 'शोमॅन' 

आर्थिक संकटातून पुन्हा उभारी घेतलेला 'शोमॅन' 

Last Updated: Jun 02 2020 11:02AM

'शोमॅन' राज कपूरराज कपूर : स्मृतीदिनानिमित्त 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता राज कपूरच्‍या निळ्‍या डोळ्‍यांतील अस्‍मानी प्रेमाने मोठ्‍या पडद्‍यावरील सुंदर नायिकांना घायाळ केले. त्‍यांच्‍या बोलक्‍या डोळ्‍यांमुळे भाव आपसुकच ऐकणार्‍याच्‍या मनाला स्‍पर्शून जायचे. एक-एक शब्‍द मनावर रुंजी घालणारा तो नायक पुढे बॉलिवूडचा 'शोमॅन' बनेल, असे कुणालाही वाटले नव्‍हते. परंतु, ते राज कपूर यांनी ते सिध्‍द करून दाखवले. २ जून रोजी त्यांचा स्मृतीदिवस. या औचित्‍याने राज कपूर यांनी आर. के. स्‍टुडिओ कसा उभारला आणि अगणित चित्रपटांचा साक्षीदार असलेला हा स्‍टुडिओ चित्रपटसृष्‍टीच्‍या इतिहासाच्‍या पानांवर रेखाटला गेला, याबद्दल जाणून घेऊया.  

Rebuilding Dream Over, Raj Kapoor's RK Studio Is Up For Sale

राज कपूर यांनी आर. के. फिल्म्स ही कंपनी स्थापन केली. पुढे मध्‍यवर्ती चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओदेखील उभारला. तत्‍कालीन ती पांढरीशुभ्र इमारत आणि त्यावरचे आर. के. नावाचे लाल अक्षरातील बोधचिन्ह दिसायचे. नायकाच्या हातावर विसावलेल्या नायिकेची आकृती निदर्शनास पडायची. घरातूनच अभिनयाचे धडे लहानपणापासूनच मिळाल्‍यामुळे साहजिकच चित्रपटात येणे राज यांना सहजशक्‍य झालं. पण, त्‍यांना सिनेसृष्‍टीत आणखी घट्‍ट पाय रोवायचे होते. म्‍हणूनच त्‍यांनी आर. के. स्‍टुडिओ उभारला. 

Raj Kapoor Biography, Age, Death, Wife, Children, Family, Wiki & More

१९७० मध्ये ‘जोकर’ चित्रपट फ्लॉप झाला, तेव्हा राज कपूर यांना स्टुडिओ गहाण ठेवायला लागला होता. पण, 'बरसात' यशस्‍वी झाला. असे म्‍हटले जाते की, अखेरच्या दिवसांत राज यांनी स्टुडिओतील दोन स्टेजेस विकून भांडवल उभे केले होते. चित्रपटातून निर्मितीतून जे उत्पन्न मिळवले होते ते सर्व राजने चित्रपटांत व स्टुडिओतच गुंतवले होते. दुसरीकडे, ‘बॉबी’ चित्रपट चांगला चालला होता. त्‍या पैशातून त्यांनी स्वतंत्र घर घेतले होते. 'बरसात,' 'आवारा,' 'श्री. ४२०,' 'आग,' 'जिस देश में गंगा बहती है,' 'मेरा नाम जोकर,' 'धरम करम,' 'सत्यम् शिवम् सुंदरम्,' 'बॉबी,' 'प्रेमरोग' यांसारख्या एकापेक्षा एक चित्रपटांचे चित्रीकरण स्‍टुडिओत झाले होते. आर. के. बॅनरचा अखेरचा चित्रपट जो तेथे चित्रीत झाला होता तो म्हणजे ‘आ अब लौट चलें’. 

https://www.thehindu.com/features/cinema/Remembering-Raj-Kapoor ...

आर. के. स्टुडिओला १६ सप्टेंबरला आग लागली. आर. के. ला आग लागली, तेव्हा ऋषी खचले होते. त्यात चित्रपटांतील वस्त्रे, वस्तू, दागिने सर्व वस्तू जळाल्या होत्या. ‘जिस देश में...’मधील पद्मिनीने घातलेले अलंकारदेखील नष्ट झाले. त्यात ‘मेरा नाम जोकर’मधील विदूषकाचा मुखवटा, नर्गिस ते ऐश्वर्यापर्यंतच्या अभिनेत्रींचे पोशाख जळून खाक झाले. कोट्‍यवधींचे नुकसान झाले. आग लागण्यापूर्वीही स्टुडिओ तोट्यात होता. पण, स्‍टुडिओत जे काही शिल्‍लक होतं, ते ही नष्‍ट झालं. 

IFTDA appeals Godrej to make 'Raj Kapoor museum' at RK studio land

गणेशोत्‍सव आणि चित्रपट उद्‍योगातील महत्त्‍वाचा सण होळी हे दोन उत्‍सव आर. के. चे वैशिष्‍ट्‍य म्‍हणता येईल. गणेशोत्सवात स्थानिक रहिवासीही सहभागी होत. होळीच्‍या सणावेळी सितारादेवी, जयकिशन, अमिताभ बच्चन, डिंपल कापडिया, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यासारखे कलाकार उपस्‍थित राहायचे. इतकेच नाही तर ऋषी कपूर आणि नीतू सिंह कपूर यांच्या लग्‍नानंतर याच स्‍टुडिओत जंगी पार्ट्या झाल्या.  हा स्टुडिओ कालबाह्य झाल्याने कपूर फॅमिलीने स्‍टुडिओ विकण्‍याचा निर्णय घेतला. अखेर, स्टुडिओ विकण्यात आल्या. आता अमूक ठिकाणी राज कपूर यांचा आर के स्टुडिओ होता, इतकाच इतिहास आता मागे राहिला आहे. 

फाइल:Raj Kapoor In Aah (1953).png - विकिपिडिया