Tue, Oct 24, 2017 16:51होमपेज › Soneri › कभी अलविदा ना कहना.... 

कभी अलविदा ना कहना.... 

Published On: Oct 13 2017 1:27PM | Last Updated: Oct 13 2017 1:28PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

‘बीच राह में दिलबर, बिछड़ जाएं कहीं हम अगर और सूनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर, हम लौट आएंगे, तुम यूं ही बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना..., याच ओळीतून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहायला लावणारे किशोर कुमार हे एक अफलातून कलाकार होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायकाचा आज स्मृतीदिन 

किशोर कुमार यांचे मुळ नाव आभास कुमार गांगुली होते. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ मध्ये एका बंगाली कुटुंबात झाला. 

किशोर कुमार यांना लहानपणापासून गायनाची आवड होती. के.एल सहगल यांच्यासारखे बनण्यासाठी किशोर कुमार वयाच्या १८ व्या वर्षी मुंबईला आले. 

किशोर कुमारांची गाणी तुम्हाला जगणे शिकवतात, तुमच्या डोळ्यात पाणी आणतात आणि चेहऱ्यावर क्षणात हासूही उमटवू शकतात. काहीशी अशीच जादू किशोर कुमारांच्या गाण्यांमध्ये होती. ‘पल पल दिल के पास, आने वाला पल, शाम कुछ अजीब सी, ये शाम मस्तानी यासारखी गाणी तुमची सायंकाळ रमणीय करू शकतात. 

मस्तीखोर किशोर

किशोर दांचे बालपण त्यांच्यापासून कधीच वेगळे झाले नाही. ते नेहमीच बालपण जगायचे. याच्याशी संबधित एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे, त्यांना मुखवटे जमवण्याचा छंद होता. परदेशात गेल्यानंतर अनेक प्रकारचे मुखवटे त्यांनी आणले होते. त्यातील एक मुखवटा घालून त्यांनी वॉचमनला भिती दाखवली होती.  

पाऊस आणि किशोर

किशोरदांना जून महिन्यात पडणारा पहिला पाऊस जितका प्रिय होता तितकाच पावसाळा संपताना पडणारा पाऊसही होता. याच कारण असं की, किशोर दा प्रत्येक पावसाला पहिल्याच पावसाप्रमाणे पाहत असत. कधीच पाऊस पाहिला नाही, अनुभवला नाही, असा विचार करत  किशोर दा पाऊस एंजॉय करत असत. त्यांची पावसातील अनेक गाणीही प्रसिद्ध आहेत. गाणे रेकॉर्ड करत असतानाच हे गाणे हिट होईल की नाही याचा अंदाज किशोर कुमार बांधत असत.

चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, संगीत दिग्दर्शक या सर्व भूमिका किशोर अगदी सहज पेलायचे. अभिनेता म्हणून ‘चलती का नाम गाडी’, ‘हाफ टिकेट’, ‘पडोसन’ आणि ‘झुमरू’ यासारखे चित्रपट आजही लक्षात राहणारे आहेत.