Sun, May 31, 2020 08:08होमपेज › Soneri › टायगरकडून हटके विश! दिशाचा स्‍पेशल व्‍हिडिओ व्‍हायरल

टायगरकडून हटके विश! दिशाचा स्‍पेशल व्‍हिडिओ व्‍हायरल

Published On: Jun 13 2019 6:21PM | Last Updated: Jun 13 2019 6:28PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचे रिलेशनीप सर्वश्रुत आहे. त्‍यांची लव्‍ह केमिस्‍ट्री एका चित्रपटातही पाहायला मिळाली होती. तर आता दिशाचा १३ जूनला वाढदिवस असल्याने टायगरने एका अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी टायगरने एक डान्‍स रिहर्सल करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

या व्हिडिओत टायगर आणि दिशा 'बेफिक्रा भी होना जरुरी है' या गाण्यांवर दोघांनी एकत्र डान्स केला आहे. या व्‍हिडिओमध्ये दोघांची केमिस्ट्री दिसत आहे. तसेच या व्हिडिओसोबत टायगरने एक कॅप्शनही लिहिली आहे की, 'हॅप्पी बर्थडे दिशा'.

सध्या दिशा 'मलंग' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तर वाढदिवसानिमित्त दिशा म्‍हणाली की, 'मी आपल्या मित्रांसोबत डिनरसाठी बाहेर जाणार आहे. मी वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप उत्साही आहे. तर मी वाढदिवसाच्या पार्टी केव्हा दिली ते आठवत नाही.'  

यानंतर दिशाला टायगरसोबतच्या डिनरबद्दल विचारनंतर म्हणाली, 'अजून कोणताही प्लॅन केलेला नाही.'

आदित्य ठाकरेमुळे दिशा झाली होती ट्रोल

आदित्य ठाकरेसोबत काही दिवसांपूर्वी दिशा डिनर डेटवर दिसल्याने ट्रोल झाली होती. खास करून टायगरच्या चाहत्यांना हे आवडले नव्हते. या फोटोला एका युजर्सने कॉमेंटसही दिल्या होती की, 'अजून टायगर जिवंत आहे.'

यावर कडक शब्दांत दिशाने उत्तर दिले होते की, 'मी आपल्या मित्रासोबत डिनरला जावू शकत नाही का?' 

(video : tigerjackieshroff instagram वरून साभार)