Sun, Jan 19, 2020 15:10होमपेज › Soneri › प्रभासच्या ‘साहो’ची प्रतीक्षा लांबली

प्रभासच्या ‘साहो’ची प्रतीक्षा लांबली

Published On: Jul 19 2019 6:05PM | Last Updated: Jul 19 2019 6:09PM
मुबंई: पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’, जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ आणि नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स २’ ही वेब सीरिज या चित्रपटांना टक्कर देण्यासाठी प्रभासचा 'साहो' हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता या चित्रपटाची रिलाज डेट बदलली आहे.‘साहो’ हा  चित्रपट १५ ऑगस्टऐवजी ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साहो’ या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे. 

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी चित्रपट निर्मात्याचे स्टेटमेंट आपल्या ट्विटरवरून शेअर केले आहे. यामध्ये असे लिहिले आहे की, 'या वर्षातील सर्वश्रेष्ठ आणि मोस्ट अवेटेड फिल्म अशा 'सोहो' या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 'बाहुबली'नंतर प्रभास आणि श्रद्धा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी तयार असून आता १५ ऑगस्टऐवजी ३० ऑगस्टला रिलीज होणार आहे.' 

Image result for प्रभास साहो

निर्मीत्याच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, 'आम्ही प्रेक्षकांना सर्वोत्तम चित्रपट देऊ इच्छितो. अशा परिस्थितीत आम्हाला काही ॲक्शन सीन्स आणि चित्रपट सर्वोत्तम बनवण्यासाठी  वेळ पाहिजे होता. म्हणून हा चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज न करता याच महिन्याच्या पुढील तारखेला रिलीज होणार आहे.'  

Related image

'साहो' च्या ॲक्शन सीन्ससाठी जगभरातील मोठ-मोठे कोरिओग्राफर टिमची मदत घेतली आहे. हा चित्रपट हिंदीशिवाय तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत यांनी 'साहो' चित्रपट बनवण्यासाठी ३०० कोटीहून अधिक रूपये खर्च केले आहेत. या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धासोबत जॉकी श्रॉफ, नील नितिन मुकेश, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्या भूमिका असणार आहेत. 

Image result for प्रभास साहो

तर 'साहो' या चित्रपटातील 'साइको सईयां' हे गाणे आणि टिझर  काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता.

(photo : taran adarsh twitter वरून साभार)