Tue, Oct 24, 2017 16:59
29°C
  Breaking News  

होमपेज › Soneri › जाणून घ्या काय होते राजेश खन्नांचे अक्षयबद्दलचे मत

जाणून घ्या काय होते राजेश खन्नांचे अक्षयबद्दलचे मत

Published On: Aug 13 2017 12:57PM | Last Updated: Aug 13 2017 1:10PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाइन वृत्‍त

बॉलिवूडची दुनिया बाहेरून आपल्‍याला खूप आकर्षक वाटत असली, तरी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी किती कष्‍ट सोसावे लागतात याला काही मोजमाप नाही. आज ज्‍याला बॉलिवूडचा खिलाडी म्‍हणतात, त्‍या रावडी अक्षय कुमारनेसुध्दा बॉलिवूडमध्ये येण्यासाठी अपार कष्‍ट केले आहेत. 

एकेकाळी अक्षय कुमारला राजेश खन्ना ऑडिशनसाठीसुध्दा लायक समजत नव्हते. अनेक वेळा अक्षय राजेश खन्ना यांच्या कार्यालयाबाहेर तास तास भर थांबत असे. राजेश खन्ना यांनी खूप वेळा अक्षयला ऑडिशनमध्ये अपात्र ठरविले. पण, अक्षयने चिकाटी आणि कष्‍टाच्या जोरावर बॉलिवडूमध्ये आपला ठसा उमटविला. 

विषेश म्‍हणजे ज्‍या राजेश खन्नांनी अक्षयला ऑडिशनच्या लायकही समजले नव्हते. त्‍यांचीच मोठी मुलगी ट्विंकल हिचाशी अक्षयचे लग्न झाले आहे. 

राजीव भाटीयापासून अक्षय कुमार बनण्यापर्यंतचा अक्षयचा प्रवास खूपच अनोखा आहे. अक्षयने प्रथम ‘सौगंध’ आणि ‘आज’ या सिनेमात काम केले होते. ‘सौगंध’ त्‍यावेळी चालला नाही आणि ‘आज’मध्ये अक्षयला फक्‍त दहा सेकंदांचीच भूमिका दिली होती. ‘आज’ या सिनेमात कुमार गौरव यांचे अक्षय नाव होते. हे नाव अक्षयला खूपच आवडले. त्‍यामुळे अक्षयने आपले राजीव भाटीया हे नाव बदलून अक्षय कुमार, असे केले. भविष्‍यात हेच नाव त्‍याच्यासाठी लकी ठरले. 

अक्षयने आपल्या उमेदीच्या काळाता हॉटेलमध्ये वेटर म्‍हणूनही काम केले. त्‍यानंतर तो मॉडेलिंग करू लागला, त्‍यात अक्षयला पुरेसे पैसे मिळू लागले. मॉडेलिंग करतानाच  दिदार सिनेमात काम करण्यासाठी अक्षयने खूप प्रयत्‍न केले. पण, दिग्‍दर्शक ऑडिशन घेण्यासाठीसुध्दा अक्षयचा विचार करत नव्हते. अक्षय एकदा नटराज स्‍टूडिओच्या बाहेर उभा असताना नरेंद्र नावाच्या एका व्यक्‍तिने त्‍याची निर्माते प्रमोद चक्रवर्ती यांच्याशी भेट करून दिली. त्‍यावेळी प्रमोद चक्रवर्ती यांनी अक्षयला दिदारमध्ये काम करण्याची संधी दिली. १९९२ साली दिदार सिनेमा प्रदर्शित झाला होता. आज अक्षय बॉलिवूडमधील सर्वांत जास्‍त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्‍याच्याकडे स्‍वत:चे विमान आणि महागड्या कारही आहेत.