Thu, Aug 22, 2019 15:02होमपेज › Soneri › जॅकलिन फर्नांडिसलाही 'टिकटॉक'चे वेड (video)

जॅकलिन फर्नांडिसलाही 'टिकटॉक'चे वेड (video)

Published On: May 16 2019 3:04PM | Last Updated: May 16 2019 6:35PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

देशभरात आता टिकटॉकची चलती आहे. दररोज प्रत्‍येकाच्‍या व्हाट्सअॅप स्‍टेटसला टिकटॉकचे व्‍हिडिओ पाहायला मिळतात. प्रत्‍येकाच्‍या घरात एक तरी व्‍यक्‍ती टिकाटॉकचा व्‍हिडिओ बनवणारा असतोच. कॉमन मॅन ते सेलेब्‍स सर्वांनाच टिकाटॉकवर प्रमे जडले आहे. यापैकी एक नाव आहे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस. जॅकलिनकडून नुकताच एक टिकटॉक व्‍हिडिओ शेअर करण्‍यात आला. सोशल मीडियावर हा व्‍हिडिओ चांगलाच व्‍हायरल होत आहे. या व्‍हिडिओत जॅकलिनचा कॉमिक अंदाज पाहायला मिळत आहे. 

जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलिनसह बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर मिकी कॉन्ट्रॅक्टर देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलिन ‘कपील शर्मा शो’मधील लोकप्रिय पात्र बच्चा यादवचा एक जोक सांगत आहे. दरम्यान जॅकलिन खूप चांगल्या प्रकारे लिप सिंग करताना देखील दिसत आहे. एकमेंकाना हाताची टाळी देत जॅकलिन व  मिकी मोठमोठ्‍याने हसताना दिसत आहेत.  या व्हिडिओ पोस्ट करताना ‘मिकी तुझासोबत असे केल्याबद्दल माफी असावी’ असे लिहिले आहे. 

जॅकलीनच्‍या चाहत्‍यांनी हा टिकाटॉक व्‍हिडिओ चांगलाचा डोक्‍यावर घेतला आहे. त्‍यामुळे हा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. 

(photo, video : jacquelinef143 instagram वरून साभार)