Fri, Nov 24, 2017 20:06होमपेज › Soneri › मनोरंजनातच कथेचे मर्म

शिक्षण पध्‍दतीवर भाष्‍य करणारा 'हिंदी मीडियम' 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा
इंग्‍लिश भाषा येणे गरजेचे असली तरी कोणतीही भाषा माणसाची श्रेष्‍ठता सिध्‍द करु शकत नाही. हा चित्रपट शिक्षण पध्‍दतीवर खुलून भाष्‍य करतो.  


पुढारी ऑनलाईन :  

बॉलीवूड अभिनेता इरफान खानचा 'हिंदी मीडियम' चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट शिक्षण पध्‍दतीवर भाष्‍य करणारा आहे. शिक्षण पध्‍दतीतील गोंधळाचे मार्मिक चित्रण 'हिंदी मीडियम'मध्‍ये दाखवण्‍यात आले आहे. 

या चित्रपटातील खास बाब म्‍हणजे, प्रत्‍येक आई-वडिलाला आपल्‍या मुलाच्‍या शिक्षणासाठी झगडावे लागते. चांगल्‍या शाळेत प्रवेश मिळण्‍यासाठी आटापिटा करावा लागतो. या गंभीर विषयाचे मार्मिक चित्रण दाखवण्‍यात आले आहे. हसत-हसत कथेचे मर्म प्रेक्षकांना लक्षात येण्‍यासारखा आहे. 

इरफान सोबत पाकिस्‍तानी अभिनेत्री सबा कमरही मुख्‍य भूमिकेत आहे. याशिवाय, अमृता सिंह, दीपक डोबरियाल, तिलोतिमा शोम या कलाकारांच्‍याही चांगल्‍या भूमिका आहेत. तिलोतिमा शोमने यापुर्वी 'किस्‍सा' या चित्रपटात इरफानसोबत अभिनय केला आहे. या चित्रपटात तिने एज्‍युकेशन काउंन्सलरची भूमिका चांगल्‍या पध्‍दतीने पार पाडली आहे.   

इरफान खान आणि सबा हे दोघे पालकांच्‍या भूमिकेत आहेत. आपल्‍या मुलीला चांगल्‍या इंग्‍लिश मीडियम शाळेत प्रवेश मिळावा म्‍हणून प्रयत्‍न करत आहेत. यासाठी इमरान आणि सबा गरीब बनतात. या मूळ विषयाशिवाय चित्रपटातून अनेक संदेश मिळतात. तसेच शाळेत चालणार्‍या श्रीमंत-गरीब भेदभावाच्‍या राजकारणावरही प्रकाश टाकतो. इंग्‍लिश भाषा येणे गरजेचे असली तरी कोणतीही भाषा माणसाची श्रेष्‍ठता सिध्‍द करु शकत नाही, असा संदेश यातून देण्‍यात आला आहे.  

. हा चित्रपट शिक्षण पध्‍दतीवर खुलून भाष्‍य करतो.  

साकेत चौधरी दिग्‍दर्शित 'हिंदी मीडियम'मधील गाणीही प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरली आहे. सध्‍या 'तैनू सूट सूट करता...'या गाण्‍यांची चलती आहे. 'हिंदी मीडियम' या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून मनोरंजनासोबत चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचवला आहे.