होमपेज › Soneri › अनुष्काची काय चूक? भाजप नेत्याकडून गुन्हा दाखल करून थेट घटस्फोट देण्याचा विराटला सल्ला!

अनुष्काची काय चूक? भाजप नेत्याकडून गुन्हा दाखल करून थेट घटस्फोट देण्याचा विराटला सल्ला!

Last Updated: May 27 2020 10:15AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

एकीकडे 'पाताल लोक' वेब सीरीजचे सर्वत्र होत कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र या सीरीजला घेऊन प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही दिवसांपासून ही वेबसीरीज वादात सापडली आहे. उत्तर प्रदेशचे भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्का शर्माविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. गुर्जर यांची परवानगी न घेता त्यांचा फोटो वापरल्याने ही तक्रार करण्यात आली आहे. इतकेच नाही तर गुर्जर यांनी विराट कोहलीला अनुष्का शर्माशी घटस्फोट घेण्याचा सल्लादेखील दिला आहे. 

वाचा - 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

अनुष्का शर्माची वेब सीरीज 'पाताल लोक'मध्ये 'बालकृष्ण वाजपेयी' नावाचा एक गुन्हेगार दर्शवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका ग्रुप फोटोचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गाझियाबाद महामार्गाचे उद्घाटन करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये योगी यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला दर्शवण्यात आले आहे. परंतु, त्या फोटोमध्ये भाजप नेते नंदकिशोर गुर्जर यांच्यासोबत इतर नेत्यांचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. यावर आक्षेप घेत नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्का शर्मावर प्रतिमा मलिन करण्याचा आरोप केला आहे. तसेच ही वेबसीरीज देशद्रोही असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

नंदकिशोर गुर्जर म्हणाले, 'पाताल लोक' वेब सीरीजमध्ये बालकृष्ण वाजपेयी नावाच्या गुन्हेगारासोबत एका मार्गाचे उद्घाटन करताना माझा आणि इतर भाजप नेत्यांचे फोटो दाखवण्यात आले आहे. मी सध्या भाजप आमदार आहे आणि माझ्या परवानगीशिवाय माझ्या फोटोचा वापर करण्यात आला आहे. 

गुर्जर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली देशभक्त आहे, देशासाठी खेळतो. अशा परिस्थितीमध्ये अनुष्का शर्माला घटस्फोट द्यायला हवा, असे नंदकिशोर गुर्जर यांनी म्हटले होते.