Sun, May 26, 2019 14:39होमपेज › Soneri › बिग बॉसचं घर आता आपल्या शहरात!

बिग बॉसचं घर आता आपल्या शहरात!

Published On: Jun 13 2018 1:38PM | Last Updated: Jun 13 2018 1:38PMमुंबई : प्रतिनिधी

अनेक देशांधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. बिग बॉससारख्या रिअ‍ॅलिटी शोचे मराठमोळे रुप कलर्स मराठी वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीस आणले आणि ते लोकांच्या पसंतीसदेखील उतरले. महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडणं, त्यांची दोस्ती, नॉमिनेशन प्रक्रिया, कॅप्टन्सी, टास्क या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे बिग बॉस मराठीचं घर. आता हेच बिग बॉस मराठीचे घर तुमच्या शहरामध्ये थेट तुच्या भेटीला येत आहे. बिग बॉस मराठीचे घर बघण्याची एक सुवर्णसंधी या कार्यक्रमाच्या तमाम चाहत्यांना कलर्स मराठी देत आहे. 

बिग बॉस मराठीचे हे घर बसच्या रुपात महाराष्ट्राच्या भेटीला उद्यापासून येणार आहे. ही बस अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा, जळगाव, वाशीम, औरंगाबादच्या काही शहरांध्ये फिरणार आहे. बिग बॉसचे हे घर एका बसमध्ये तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये घरातील गार्डन एरिया, लिव्हिंग रूम आणि कन्फेशन रूम हुबेहूब तयार करण्यात आले आहेत. या बसमध्ये तीन रूम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुमला भेट दिल्यानंतर तसा फीलही येणार आहे. बिग बॉस मराठीच्या घराचे प्रतिरूप बसमध्ये तयार करण्यास १० ते १५ दिवसांचा कालावधी लागला. हे प्रतिरुप तयार करताना देखील बरेच अडथळे देखील आले. तरीसुध्दा खास प्रेक्षकांसाठी हे तयार करण्यात आले आहे.

बिग बॉस मराठीच्या या घराला भेट दिल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमातील घरात गेल्याचा आनंद मिळणार आहे, हे नक्‍की!