Sun, Dec 08, 2019 19:11होमपेज › Soneri › 'कोकणचा माणूस' बिग बॉसमधून बाहेर 

'कोकणचा माणूस' बिग बॉसमधून बाहेर 

Published On: Jun 17 2019 7:02PM | Last Updated: Jun 17 2019 7:02PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मालवणी सम्राट,  ‘कोकणचो माणूस’ दिगंबर नाईक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात रोज काही ना काही घडत असतं. कधी हास्‍य, विनोद तर कधी वाद, मतभेद या सगळ्‍या गोष्‍टींमध्‍ये मागचा आठवडा गेला. घरातील सदस्यांच्‍या वादातील टास्क, दुसरे एलिमिनेशन हे सर्व रविवारच्या वीकेंडच्‍या डावमध्ये पार पडले. 

नेहा शितोळे, वीणा जगताप, माधव देवचके, किशोरी शहाणे, दिगंबर नाईक हे नॉमिनेशनमध्ये होते. तर अभिजीत बिचुकले व दिगंबर नाईक डेंजर झोनमध्ये आले होते. अखेर दिगंबर नाईक यांना बाहेर पडावे लागले.

दरम्‍यान, हिना पांचाळची वाइल्ड कार्ड एन्‍ट्री झाली. घरात प्रवेश केल्यानंतर तिने सदस्यांना विशेषणे दिली.  वीणाला फटकळ, बिचुकलेला तापट, माधवला कन्फ्युज, नेहाला बोलबच्चन तर परागला डोकेबाज ही विशेषणे दिली.
रविवारच्या भागात वीणा व अभिजीत बिचुकले यांच्यात शाळा सुटली पाटी फुटली या टास्कदरम्यान वाद झाला.